मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Brij Bhushan Singh : ६ वेळा खासदार, लैंगिक शोषणाचे आरोप अन् राज ठाकरेंना भिडणारे ब्रिजभूषणसिंह कोण?

Brij Bhushan Singh : ६ वेळा खासदार, लैंगिक शोषणाचे आरोप अन् राज ठाकरेंना भिडणारे ब्रिजभूषणसिंह कोण?

Jan 04, 2024, 06:03 PM IST

  • Who is brij Bhushan sharan singh : यूपीमधून सहा वेळी खासदार झालेले व कुस्तीच्या क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सतत वादात अडकणारे ब्रिजभुषण सिंह कोण जाणून घेऊयात..

ब्रिजभूषणसिंह

Who is brij Bhushan sharan singh : यूपीमधून सहा वेळी खासदार झालेले व कुस्तीच्या क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सतत वादात अडकणारे ब्रिजभुषण सिंह कोण जाणून घेऊयात..

  • Who is brij Bhushan sharan singh : यूपीमधून सहा वेळी खासदार झालेले व कुस्तीच्या क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सतत वादात अडकणारे ब्रिजभुषण सिंह कोण जाणून घेऊयात..

भारताच्या अनेक दिग्गज पैलवानांच्या नेतृत्वात ३० भारतीय पैलवान दिल्लीतील जंतर-मंतरवर निर्देशने करत आहेत. या पैलवानांचा आरोप आहे की, कुस्ती संघ त्यांचे शोषण करत आहे.  संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह मनमानी पद्धतीने संघ चालवत आहे. पैलवानांसोबत त्यांचे प्रशिक्षक पाठवले जात नाहीत व विरोध केल्यानंतर धमकी दिली जाते. महिला पैलवान विनेश फोगाट हिने आरोप केला आहे की, ब्रिजभूषण सिंह यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. त्यांच्या जवळचे लोकही मुलींचे लैंगिक शोषण करतात. खेळाडूंबरोबरच महिला प्रशिक्षकांचेही शोषण केले जाते. 

ट्रेंडिंग न्यूज

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

लैंगिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या... विनेश फोगट-साक्षी मलिकचे कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षांवर आरोप

मात्र ही पहिलीच घटना नाही, की ब्रिजभूषण सिंह वादात अडकले आहेत. ब्रिजभूषण सिंह कुस्ती संघाचे अध्यक्ष होण्याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत. 

ब्रिजभूषण शरण सिंह २०११ पासून भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत व फेब्रुवारी २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष निवडले गेले. त्याचबरोबर यूपीच्या गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज मतदारसंघातील खासदारही आहेत. ब्रिजभूषण सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. 

ब्रिजभूषण शरण सिंह त्या ४० आरोपींमध्येही सामील आहेत. जे १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यामध्ये सामील होते. दरम्यान ३० सप्टेंबर २०२० रोजी त्यांना न्यायालयाने सर्व आरोपांतून मुक्त केले. 

राज ठाकरेंना आव्हान -

उत्तर प्रदेशच्या भूमीवर राज ठाकरेंना पाय ठेऊ देणार नाही, असे थेट आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी दिले होते. त्यावेळी राज ठाकरेंना आव्हान देणारा हा नेता कोण याची खूप चर्चा झाली होती.

 

विभाग