मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  थर्टी फर्स्टला नैनिताल, डेहराडून, मसुरीला जायचय? फक्त ‘या’ पर्यटकांनाच मिळणार प्रवेश

थर्टी फर्स्टला नैनिताल, डेहराडून, मसुरीला जायचय? फक्त ‘या’ पर्यटकांनाच मिळणार प्रवेश

Dec 30, 2022, 03:51 PM IST

    • नैनिताल, मसुरी या ठिकाणी वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nainital lake in Uttarakhand (HT Photo) (HT_PRINT)

नैनिताल, मसुरी या ठिकाणी वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    • नैनिताल, मसुरी या ठिकाणी वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू झालीय. देशभरात अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांचे अतिरिक्त जत्थे दाखल होणार आहे. या परिस्थितीत वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. उत्तराखंड म्हणजे देशभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण. येथील नैनिताल, मसुरी या ठिकाणी वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन शक्कल लढवली आहे. उत्तराखंडमध्ये नैनिताल आणि मसुरी या शहरांत ३१ डिसेंबर रोजी दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी आधीपासून हॉटेलचं बुकिंग असणं बंधनकारक केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

याबाबत उत्तराखंड पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात डेहराडून, पौरी गढवाल, टेहरी गढवाल आणि नैनिताल या जिल्ह्यातील नवीन वर्षासंबंधी पोलीस दलाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना सोयीचे होईल अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी पर्यटनस्थळावर पार्किंगसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे, वाहतूक वळवणे याबाबत चर्चा करण्यात आली. शिवाय नैनिताल आणि मसुरी शहरांमध्ये प्रवेश करताना ज्या पर्यटकांजवळ हॉटेलचं आधीपासून बुकिंग असेल त्यांनाच फक्त सोडण्यात येणार आहे.

डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश आणि मसुरी येथे वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे. वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलांविषयी सर्वसामान्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसोबत मैत्रिपूर्ण भावनेनं वागा, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी प्रसार माध्यमांना दिली.

थर्टी फर्स्टच्या दिवशी नैनितालमध्ये दुचाकींना प्रवेश बंदी

नैनिताल शहरात ३१ डिसेंबर रोजी दुचाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. शहराबाहेरून दुचाकीवर स्वार होऊन येणाऱ्या प्रवाशांमुळे वाहतुकीस खोळंबा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नैनिताल शहरात ७५ टक्के पार्किंग फुल्ल झाल्यानंतर बाहेरून येणारी वाहने रुसी बायपासकडे वळवण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी धीरज सिंह गर्बियाल यांनी दिली.