मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 28 May 2023 : संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा ठराविक लोकांसाठीच- शरद पवार
Live News Updates 28 May 2023 (HT)

Live News Updates 28 May 2023 : संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा ठराविक लोकांसाठीच- शरद पवार

May 28, 2023, 06:35 PMIST

Live News Updates 28 May 2023 : संसदेच्या उद्घाटनाला साधू, महाराज मंडळी आणण्यात आली, त्याचं मला कौतुक वाटतं, काही ठराविक लोकांसाठीच हा सोहळा होता की काय, अशी शंका येत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

May 28, 2023, 06:35 PMIST

नारेगावातील विजेच्या समस्यांचे सोडवू अधीक्षक अभियंता जमधडे यांचे आश्वासन

नारेगाव परिसरातीलविद्युत ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण केले जाईल, ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी केले.

May 28, 2023, 05:43 PMIST

'शासन आपल्या दारी' अभियानात कृषी ग्राहकांना वीजजोडणी प्रमाणपत्रे

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेले 'शासन आपल्या दारी' अभियान कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२६ मे) राबवण्यात आले. या अभियानात कन्नड तालुक्यातील 28 कृषी ग्राहकांना प्रातिनिधीक स्वरूपात वीजजोडणी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.

May 28, 2023, 01:02 PMIST

Sharad Pawar : संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावर शरद पवारांची टीका, म्हणाले...

Sharad Pawar On New Parliament Inauguration : दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची संकल्पना मांडली होती. परंतु सध्या जे संसदेत चाललं आहे त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. संसदेच्या उद्घाटनाला साधू, महाराज मंडळी आणण्यात आली, त्याचं मला कौतुक वाटतंय, काही ठराविक लोकांसाठीच हा सोहळा होता की काय, अशी शंका येत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

May 28, 2023, 12:44 PMIST

ONGC :  ओएनजीला जानेवारी ते मार्च तिमाहीत २४७.७० कोटींचा तोटा 

भारतातील तेल आणि गॅस उत्पादक कंपनी ओएनजीसीने सांगितले की, मार्च २०२३ च्या तिमाही दरम्यान कंपनीला २४७.७० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. विवादित करासंदर्भात १२,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची तरतूद केल्याने हे नुकसान झाले आहे. ओएनजीसीला जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान ८८५९.५४ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

May 28, 2023, 09:30 AMIST

New Parliament Inauguration : भारताच्या इतिहासात सुवर्णक्षण, पीएम मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन

New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यामुळं आता देशाला नवीन संसद मिळाली आहे.

May 28, 2023, 08:28 AMIST

New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंगोलसमोर नतमस्तक, नव्या संसदेत स्पीकरच्या खुर्चीशेजारी सेंगोलची स्थापना

New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीतील नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पीएम मोदी यांच्यासह देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती संसदेत दाखल झाल्या आहे. सकाळी पूजाविधी सुरू करण्यात आला आहे, त्यानंतर पीएम मोदी हे सेंगोलसमोर नतमस्तक झाले असून लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे.

May 28, 2023, 06:42 AMIST

Niti Aayog : नीती आयोगाच्या बैठकीला तब्बल दहा मुख्यमंत्र्यांची दांडी

Niti Aayog Meeting 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत देशातील दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळं आता यावरून भाजपा आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

May 28, 2023, 06:41 AMIST

cabinet expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार

cabinet expansion maharashtra : सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच कॅबिनेट विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले असून यावेळी कॅबिनेट विस्तारावर त्यांची मोदी-शहांशी चर्चा होणार आहे. त्यामुळं आता शिंदे गट आणि भाजपच्या इच्छुकांनी मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

May 28, 2023, 06:40 AMIST

New Parliament Building : नव्या संसद भवनाचं आज पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण

New Parliament Building : दिल्लीतील नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. दुपारी एक ते दोन वाजता मोदी नव्या आणि ऐतिहासिक वास्तूचं लोकार्पण करणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्याचा आरोप करत १९ विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

    शेअर करा