मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 06 May 2023 : खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग, लाखोंचं नुकसान
Live News Updates

Live News Updates 06 May 2023 : खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग, लाखोंचं नुकसान

May 06, 2023, 05:22 PMIST

Fire: खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला पहाटे दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

May 06, 2023, 05:22 PMIST

spicejet insolvancy : स्पाईसजेटच्या दिवाळखोरी प्रक्रियेवर ८ मे ला सुनावणी

देशभरातील विमान वाहतूक क्षेत्रावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. गो फर्स्टनंतर स्पाईसजेट विमान कंपनीच्या अडचणीही वाढत आहेत. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) पुढील आठवड्यात स्पाईसजेट या विमान कंपनीच्या कर्जदात्याने दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. स्पाईसजेटला कर्ज देणाऱ्या आयर्लंड येथील एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल लिमिटेड कंपनीने वाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीकडे अर्ज दाखल केला आहे. २८ एप्रिल रोजी हा अर्ज दाखल करण्यात आला होता.

May 06, 2023, 03:57 PMIST

Car Sales :  एप्रिल महिन्यात वाहन विक्रीत ४ टक्के घट 

भारतातील वाहनांच्या एकूण किरकोळ विक्रीत ४.०३ टक्के घट झाली आहे. एप्रिलमध्ये देशभरात १७२४,९३५ वाहनांची विक्री झाली. तर मागील वर्षी याच महिन्यात १७,९७,४३७ वाहनांची विक्री झाली होती. एप्रिल महिन्यापासून देशात लागू करण्यात आलेले उत्सर्जन नियम हे यामागे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने नुकतीच एप्रिल २०२३ मधील वाहनांच्या किरकोळ विक्रीची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, प्रवासी वाहनांच्या (कार) किरकोळ विक्रीत गेल्या महिन्यात १ टक्के घट झाली आहे. मात्र, तीनचाकी वाहनांच्या विक्रीत वर्षभरात ५७ टक्के वाढ झाली आहे. ट्रॅक्टर विक्रीत १ टक्के आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत २ टक्के वाढ झाली आहे.

May 06, 2023, 03:55 PMIST

TVS Motor : टीव्हीएस मोटरच्या नफ्यात वाढ 

चेन्नईस्थित टीव्हीएस मोटर कंपनीने गुरुवारी ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत एकत्रित नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ नोंदवून ३३६ कोटी रुपयांची नोंद केली. या काळात विक्री वाढल्याने कंपनीच्या नफ्यातही वाढ झाली आहे.मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीचा नफा २७५ कोटी रुपये होता.

May 06, 2023, 02:47 PMIST

Adani Power result :  अदानी पावरच्या नफ्यात १३ टक्के वाढ 

गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत अदानी पॉवर लिमिटेड (APL) चा निव्वळ नफा सुमारे १३ टक्क्यांनी वाढून ५,२४२ कोटी रुपये झाला आहे.

कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ४,६४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.एपीएलने म्हटले आहे की, "आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत करोत्तर नफ्यात वाढ झाली आहे. दुसरीकडे, एकूण खर्च वार्षिक आधारावर ७,१७४ कोटी रुपयांवरून ९,८९७ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

May 06, 2023, 11:04 AMIST

Jet airways :  जेट एअरवेज, नरेश गोयल यांच्या कार्यालयावर सीबीआयचे छापे

जेट एअरवेजच्या आवारात आणि एअरलाइनचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) ५३८ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

May 06, 2023, 09:29 AMIST

Gold Loan :  द्वारा स्मार्टगोल्ड आणि जना स्मॉल फायनांस बँक यांच्यात करार 

द्वारा स्मार्ट गोल्ड या फिनटेक कंपनीने जना स्मॉल फायनांस बँकेसोबत करार केला आहे. या करारांतर्गत कंपनी ग्राहकांना सोन्यावर ऑनलाइन आणि ऑफलाईन स्वरूपात सोन्यावर कर्ज पुरवठा करणार आहेत. ही सेवा महाराष्ट्र तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यात उपलब्ध असेल.

May 06, 2023, 09:27 AMIST

Milets :  घानामध्ये ‘मिलेट्स मॉडेल फार्म’ स्थापन करण्यासाठी करार

शाश्वत कृषी उपाय योजनांचा एक आघाडीचे प्रदाते यूपीएलने २०० एकर जमिनीवर ‘मिलेट्स मॉडेल फार्म’ ची स्थापना करण्यासाठी रिपब्लिक ऑफ घाना सोबत सहभागीदारी करण्याची घोषणा केली आहे. यूपीएल समूहाचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ आणि रिपब्लिक ऑफ घानाचे कृषीमंत्री झुल्फिकार मुस्तफा यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी घानातील जॉर्जटाऊन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ज्याचा उद्देश वेगवेगळ्या भरड धान्यांच्या प्रकारांना घानामध्ये पिकवण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्यांच्या अनुकूलतेचे मूल्यमापन करणे हा आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माननीय श्री. एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली एका भारतीय शिष्टमंडळाने घानाला भेट देऊन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या भागीदारीमध्ये यूपीएल तांत्रिक कौशल्य आणि शेतीतील निवडक कच्चा माल पुरवेल तर घानामध्ये या प्रयोगास अनुकूल व योग्य अशी २०० एकर जमीन आणि शेतीच्या कामकाजासाठी स्थानिक कामगार व अन्य सहाय्य रिपब्लिक ऑफ घाना उपलब्ध करून देईल.

May 06, 2023, 08:53 AMIST

Fire: खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग

Fire: खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला पहाटे दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले आहे. आगीत कागदपत्र जळून खाक झाले असून दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

May 05, 2023, 10:46 PMIST

उद्धव ठाकरेंच्या बारसूमधील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

कोकणातील बारसू-सोलगावात प्रस्तावित असलेल्या तेल रिफायनगरी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. रिफायनरी विरोधी आंदोलकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसूत जाहीर सभा घेणार आहे. परंतु उद्या होणाऱ्या ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता रत्नागिरीत शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्हं आहे.

May 05, 2023, 07:03 PMIST

अजित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा अजित पवारांची अनुपस्थिती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण. 

May 05, 2023, 06:49 PMIST

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी केला डान्स

शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी कार्यकर्त्यांसमवेत यशवंतराव चव्हाण सेंटर परिसरात आनंदाने असा डान्स केला

May 05, 2023, 06:38 PMIST

राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार यांचे संपूर्ण निवेदन वाचा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे आज जाहीर केले. यावेळी पवार यांनी एक निवेदन जारी केले आहे.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला

May 05, 2023, 06:34 PMIST

शरद पवार यांचा राजीनामा मागे

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. 

शरद पवार यांचा राजीनामा मागे
शरद पवार यांचा राजीनामा मागे

May 05, 2023, 05:16 PMIST

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील तुमकूरू शहरात आज निवडणूक प्रचारादरम्यान रोड शो केला.

Prime Minister Narendra Modi holds a roadshow in Tumakuru (Karnataka)
Prime Minister Narendra Modi holds a roadshow in Tumakuru (Karnataka)

May 05, 2023, 04:45 PMIST

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची हे आज सायंकाळी साडेपाच वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय ते मागे घेतात की त्यावर ठाम राहतात, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

May 05, 2023, 04:44 PMIST

केएल राहुल WTC Final मधून बाहेर

KL Rahul ruled out from WTC Final : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल या फायनलमधून बाहेर पडला आहे. त्याने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

May 05, 2023, 04:03 PMIST

Closing Bell : आठवड्याच्या शेवटच्या सत्रात निर्देशांकाची घसरगुंडी, निर्देशांकात १ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स १.१३ टक्के तर निफ्टी १.०२ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स ६९४ अंशांनी घसरून ६१०५४ वर बंद झाला, तर निफ्टी १८६ अंशांनी घसरून १८०६९ अंशांवर बंद झाला. आज निफ्टी ५० मध्ये TITAN, MARUTI, ULTRACEMCO, NESTLEIND, APOLLOHOSP हे शेअर्स टाॅप गेनर्समध्ये होते. तर दुसरीकडे, HDFCBANK, HDFC, INDUSINDBK, HINDALCO, TATASTEEL हे शेअर्स टाॅप लूजर्समध्ये होते.

May 05, 2023, 02:58 PMIST

Reliance - Yes bank :  रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि येस बँकेत करार 

रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही प्रीमियम भरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी - ई- रूपी (e ) स्वीकारणारी आघाडीची सर्वसाधारण विमा कंपनी बनली आहे. कंपनीने येस बँकेशी डिजिटल स्वरुपात प्रीमियम स्वीकारण्यासाठी करार केला असून त्यासाठी बँकेचा e प्लॅटफॉर्म वापरला जाणार आहे. ज्या ग्राहकांकडे कोणत्याही बँकेचे सक्रिय e वॉलेट आहे, त्यांना रिलायन्स जनरल इन्शुरन्सचा e किंवा क्यूआर कोड वापरून लगेच पैसे भरता येतील. या क्रांतीकारी लाँचच्या मदतीने कंपनीने आपल्या ग्राहकांना पैसे भरण्याचा सोपा, सुरक्षित, तत्काळ आणि हरित पर्याय उपलब्ध करत दर्जेदार ग्राहक सेवा देण्याची बांधिलकी नव्या उंचीवर नेली आहे.

May 05, 2023, 02:34 PMIST

Drone Aacharya result : ड्रोन आचार्य कंपनीच्या नफ्यात वाढ 

पुणे स्थित एकात्मिक ड्रोन इकोसिस्टम स्टार्ट-अप ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्सने आर्थिक वर्ष २०२३चे आणि दुसऱ्या सहामाहीचे निकाल जाहीर केले. विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ आणि धोरणात्मक भागीदारीमुळे कंपनीने चांगली कामगिरी नोंदवली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीने प्रथमच आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण महसुलात ४१७ टक्क्ंयाची वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ३.५८ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीने १८.५७ कोटी रुपये महसूल मिळवला आहे. कंपनीचा EBITDA आणि करोत्तर नफा अनुक्रमे ४.९९ कोटी रुपये आणि ३.४२ कोटी रुपये आहे. या दोन्हींमध्ये आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वर्षाच्या कामगिरीचे नेतृत्व आर्थिक वर्ष २०२३ मधील दुसऱ्या सहामाहीतील चढ्या व्यवसायवाढीमुळे आणि सहामाहीतील महसुलात १७२ टक्के वाढीमुळे वार्षिक कामगिरीत लक्षणीय होण्यात मदत झाली आहे.

 

May 05, 2023, 12:38 PMIST

Pune : अभिनेते किरण माने यांना पंधरावा 'सम्यक पुरस्कार' जाहीर

 

'सम्यक पुरस्कार समिती ' तर्फे देण्यात येणारा ' सम्यक पुरस्कार ' पुरस्कार चित्रपट अभिनेते किरण माने यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच गुलाब गजरमल ,रामहरी ओव्हाळ, रमेश राक्षे , उत्तम वनशिव, शरद जाधव आणि प्रा. के. व्ही. सोनकांबळे या मान्यवर व्यक्तींना सम्यक पुरस्कार जाहीर झालेला आहे.'सम्यक पुरस्कार समिती 'चे संस्थापक अध्यक्ष नागेश भारत भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

May 05, 2023, 12:37 PMIST

Godrej property : गोदरेज प्रॉपर्टीजचे तिमाही निकाल जाहीर 

देशातील आघाडीची स्थावर मालमत्ता विकासक कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष आज जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये एकूण बुकिंग मूल्य मागील वर्षीच्या आणि तिमाहीच्या तुलनेत २५% नी वाढून ४०५१ कोटी रुपये नोंदवले गेले, या तिमाहीत ५.२५ मिलियन चौरस फीट क्षेत्राची विक्री करण्यात आली.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दाखल करण्यात आल्याने तसेच व्हॉल्युममध्ये १५.२१ मिलियन चौरस फीट इतकी प्रचंड तब्बल ४०% वृद्धी झाल्याने बुकिंग मूल्य ५६% नी वाढून १२,२३२ कोटी रुपयांवर पोहोचले. एनसीआर, एमएमआर, बंगलोर आणि पुणे या चार मोठ्या बाजारपेठांपैकी प्रत्येकामध्ये एका वर्षभरात २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त बुकिंग मूल्य मिळवणारी ही एकमेव विकासक कंपनी ठरली आहे.

May 05, 2023, 11:28 AMIST

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

May 05, 2023, 10:49 AMIST

Fastag :  आयसीआयसीआय बँकेतर्फे युपीआयद्वारे फास्टॅग ऑटो रिचार्जची सुविधा

आयसीआयसीआय बँकेने  युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज (युपीआय) मँडेटच्या माध्यमातून फास्टॅग ऑटो रिचार्ज सुविधा नुकतीच लाँच केली आहे. या सुविधेमुळे युजर्सना त्यांचे फास्टॅग आपोआप, पूर्णपणे डिजिटल पद्धतीने आणि आधी सुनिश्चित केलेल्या सूचनांनुसार रिचार्ज करता येणार आहे. यामुळे युजर्सना टोल प्लाझावरील फास्टॅग लेन्समधून सहजपणे पुढे जाता येईल व खात्यात अपुरे पैसे असल्यामुळे होणारी गैरसोय टाळता येईल.

May 05, 2023, 10:35 AMIST

Dagadusheth Halwai Ganpati: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

Dagadusheth Halwai Ganpati : शेतकऱ्यांचा समस्या दूर व्हाव्या, आरोग्यसंपन्न भारताकरीता आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त हा महोत्सव आयोजित केला होता.

May 05, 2023, 10:01 AMIST

Opening bell : शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने, सेन्सेक्समध्ये ५८६ अंशाची घट, निफ्टीही घसरला

देशांतर्गत बाजारपेठेत गुरुवारच्या उसळीनंतर आठवड्याच्या शेवटच्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली. बीएसईचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये सुरुवातीला ५८९ अंशांची घट झाली. सेन्सेक्स ६११६३ अंश पातळीवर खुला झाला. निफ्टीतही अंदाजे ३९० अंशांची घट नोंदवत तो अंदाजे १८११७ अंश पातळीवर खुला झाला. निफ्टीच्या टाॅप गेनर्समध्ये अदानी एन्टरप्राईजेस, ICICI बँक, एल अँड टी, नेस्ले, अॅक्सिस बँकसारख्या स्टाॅक्सचा समावेश आहे. तर निफ्टी टाॅप लूजर्समध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इंडसएड बँक, हिंडाल्को आणि एशिअन पेंट्सचा समावेश आहे.

May 05, 2023, 09:08 AMIST

Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्यावर आज समिती घेणार निर्णय; अध्यक्ष निवड समितीची आज बैठक

Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत आज निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पावर हे अध्यक्ष राहणार की त्यांच्या जागी दुसऱ्याची निवड करावी या बाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

May 05, 2023, 08:33 AMIST

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात आठ दिवसापासून अवकाळीचा कहर, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान

 हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात फटका हा भाजीपालावर्णीय पिकांना बसत आहे. कारले, वांगे, टोमॅटो, मिरची यासारख्या पिकांना या पावसाचा फटका बसत आहे.

May 05, 2023, 08:02 AMIST

Chardham Yatra : चारधाम यात्रेला जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात; मोठी दरड कोसळली; थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा video व्हायरल

Chardham Yatra : चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक हे बद्रीनाथ, केदारनाथ या याठिकाणी जात आहे. मात्र, या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

May 05, 2023, 06:43 AMIST

Pune : पुण्यात १० मे रोजी ‘रोजगार मेळावा; दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

 नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील दुसरा रोजगार मेळावा येत्या १० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

May 05, 2023, 06:42 AMIST

Pune : स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे महानगरपालिका येथे दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पुणे शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पुणे महानगरपालिका व कचरा वाचकांच्या स्वच्छ मॉडेल संदर्भातील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटचे प्रमुख अतुल विश्वास आदी उपस्थित होते.

May 05, 2023, 06:42 AMIST

Pune : महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोर यांच्यासमोरील अर्धन्यायिक, अपील कामकाजामधील अर्धन्यायिक, अपील प्रकरणे विशेष लोकन्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत. या विशेष लोक न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान तडजोडनामा दाखल केल्यानंतर त्याच दिवशी अर्धन्यायिक, अपील प्रकरणामध्ये निर्णय पारित करण्यात येणार आहे. 

May 05, 2023, 06:10 AMIST

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळीचा कहर, शेती पिकांना मोठा फटका

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घटले आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे.

    शेअर करा