मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 29 April 2023 : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला धक्का
Live News Updates

Live News Updates 29 April 2023 : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला धक्का

Apr 29, 2023, 06:49 PMIST

APMC Election 2023 Result : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठं धक्का बसला आहे.

Apr 29, 2023, 06:49 PMIST

ठाणेः भिवंडी शहरात तीन मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या दोनवर

ठाणे जिल्ह्यात भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली. वर्धमान कंपाऊंड नावाची ही इमारत कोसळल्याने दोन रहिवासी ठार झाले आहेत. तर १० रहिवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

ठाणेः भिवंडी शहरात तीन मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या दोनवर
ठाणेः भिवंडी शहरात तीन मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या दोनवर

Apr 29, 2023, 06:15 PMIST

मुंबईत महापालिका कार्यालयाच्या गच्चीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

मुंबईः चेंबूर परिसरातील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन व व्यवस्थापन करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एम पश्चिम' विभागाने पर्यावरण पूरकता व ऊर्जा बचत साध्य करण्याच्या उद्देशाने विभाग कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली आहे. या प्रकल्पातून दरमहा ५ हजार युनिट ऊर्जेची निर्मिती होणार. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठीच करण्यात येणार असून यामुळे दरमहा सुमारे ४२ हजार ५०० इतक्या रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे, अशी माहिती 'एम पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

महापालिका कार्यालयाच्या गच्चीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प
महापालिका कार्यालयाच्या गच्चीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

Apr 29, 2023, 03:14 PMIST

भिवंडीत बहुमजली इमारत कोसळली, १० जण अडकल्याची भीती

ठाण्यातील भिवंडी परिसरातील एक बहुमजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीत १० जण अडकले आहे. त्यानंतर आता अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Apr 29, 2023, 12:36 PMIST

APMC Election 2023 Result : अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता

अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समितितील सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. तर वंचित समर्थित पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला.

Apr 29, 2023, 12:15 PMIST

APMC Election 2023 Result : छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला धक्का

APMC Election 2023 Result : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर  बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठं धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १५  पैकी ११  जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४  जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Apr 29, 2023, 11:47 AMIST

Pune : वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकाऱ्याची आत्महत्या 

वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे ( वय : ५६ ) यांनी  पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे  कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत 

Apr 29, 2023, 10:50 AMIST

Pune APMC Election 2023 : हवेली कृषि उत्पन्न बाजर समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात

हवेली कृषि उत्पन्न बाजर समितीची निवडणूक तब्बल १९ वर्षांनंतर होत असून ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी सहकार पॅनल यामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. १८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे. स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Apr 29, 2023, 09:57 AMIST

Pune Mumbai express way accident : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गहूंजे गावावत मालवाहू टेम्पोला अपघात, एक जखमी.

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गहूंजे गावावत मालवाहू टेम्पोला अपघात, एक जखमी. गहूंजे गावच्या हद्दीत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोचा अपघात. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी. या अपघातात टेम्पो चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झालाय, तर शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. 

Apr 29, 2023, 09:44 AMIST

Bhushan Singh : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरल्या प्रियांका गांधी मैदानात, केजरीवालही घेणार जंतरमंतरवर आंदोलकांची भेट

Congress leader Priyanka Gandhi Vadra meets the wrestlers : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ प्रियंका गांधी दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचल्या आहेत.

Apr 29, 2023, 08:11 AMIST

Pune Crime : पुणे हादरले ! भिकारी महिलेवर बलात्कार; चौघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना सर्वाधिक आहेत. अशीच एक घटना पुण्यातील येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुलेनगर परिसरात घडली.

Apr 29, 2023, 06:41 AMIST

बारसू रिफायनरी संबंधित पालकमंत्री उदय सामंत बैठक घेणार

रत्नागिरी : रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यानंतर आज पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहेत  

Apr 29, 2023, 06:40 AMIST

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी

अहमदाबाद :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होईल. सुरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  

Apr 29, 2023, 06:39 AMIST

APMC Election 2023 : राज्यातील ९५ बाजार समित्यांचा आज निकाल

APMC Election 2023 : शुक्रवारी राज्यातील 147 बाजार समित्यांमध्ये मतदान झालं. त्यापैकी 95 समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. 34 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच झाली आहे. त्यामध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या निवडणुका म्हणजे राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचं सांगितलं जातंय.

Apr 29, 2023, 06:08 AMIST

Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj : मॉरिशसमध्ये उभारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीचा पुतळा

Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आले. मॉरिशस पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

    शेअर करा