मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 26 January 2023 : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल
Uddhav Thackeray (HT)

Live News Updates 26 January 2023 : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल

Jan 26, 2023, 01:12 PMIST

Breaking News Live 26 January 2023: शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात पाय ठेवणार आहेत.

Jan 26, 2023, 12:39 PMIST

Uddhav Thackeray: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज प्रथमच मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात पाय ठेवणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे ठाण्यातील तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देतील. त्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आनंद आश्रमात जाणार आहेत.

Jan 26, 2023, 01:08 PMIST

Republic Day 2023 : ब्रुनेईच्या सुलतानकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 देशभरात आज ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील देशातून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या दिल्या जात आहेत. यातच ब्रुनेईच्या सुलतान हसनल बोल्कियाह यांनी पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहेत.

Jan 26, 2023, 01:07 PMIST

Republic Day Celebration : इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांचे कर्तव्यपथावर स्वागत

राष्ट्रपती मुर्मू आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांचे कर्तव्यपथावर आगमन झाल्यावर देशाचे पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरलअनिल चौहान यांनी त्यांचे स्वागत केले.

Jan 26, 2023, 01:07 PMIST

CSMT : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ध्वजारोहण

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी देशाच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिरंगा फडकवला.

Jan 26, 2023, 08:44 AMIST

Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

देशाच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jan 26, 2023, 08:40 AMIST

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचा आज ठाणे दौरा

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज ठाणे दौरा करणार आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

Jan 26, 2023, 07:56 AMIST

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत मेट्रो सेवा

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांसाठी मोफत मेट्रो सेवा असेल. रात्री ८ वाजेपर्यंत तिकीट किंवा निमंत्रण पत्रक दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे.

Jan 26, 2023, 07:23 AMIST

Republic Day 2023: पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

देशभरात आज ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय.याचे औचित्य साधून पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Jan 26, 2023, 06:34 AMIST

Nigeria Bomb Explosion: नायजेरियामध्ये बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

वांशिक आणि धार्मिक तणावासाठी ओळखल्या जाणार्‍या मध्य नायजेरियामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २७ पशुपालकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

    शेअर करा