मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत; प्रवाशांचा स्थानकापर्यंत रुळांवरून प्रवास!

Mumbai: तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत; प्रवाशांचा स्थानकापर्यंत रुळांवरून प्रवास!

Jan 16, 2024, 04:51 PM IST

    • Mumbai Metro Viral Video: बोरिवलीत तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
Mumbai Metro (file Pic)

Mumbai Metro Viral Video: बोरिवलीत तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

    • Mumbai Metro Viral Video: बोरिवलीत तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Mumbai Borivali Metro News: बोरिवलीमधील एकसर आणि मंडपेश्वर स्थानकांदरम्यान आज सकाळी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत झाली, अशी माहिती मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एमएमआरडीएने दिली. एमएमआरडीएने त्वरीत तांत्रिक बिघाड दूर केला आणि मेट्रो सेवा पूर्ववत करण्याचे अश्वासन दिले. मात्र, अचानक रस्त्यामध्ये मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क रुळांवरून चालत जावे लागले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : अमरावतीत ऑरेंज अलर्ट; राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

तांत्रिक बिघाडामुळे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रुळावरून चालत जावे लागले. मेट्रो ट्रॅकवरून प्रवाशांना चालतानाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच एमएमआरडीने नेमके कशामुळे मेट्रो सेवा ठप्प झाली, याबाबत माहिती दिली नाही.

एमएमआरडीने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेत व्यक्त केले. तसेच एकसर आणि मंडपेश्वर दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देणारे निवेदन जारी केले. तसेच समस्यांचे निराकरण झाले असून मेट्रो सेवा पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. मात्र, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमदरम्यान मेट्रो सेवा पूर्वरत करण्यात थोडा विलंब झाला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा