मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur: आदल्या दिवशी वाढदिवसाचे सेलिब्रेशन, दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

Kolhapur: आदल्या दिवशी वाढदिवसाचे सेलिब्रेशन, दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

May 24, 2023, 03:55 PM IST

  • Kolhapur Rains: कोल्हापुरातील भटगाव पुलाजवळ अंगावर झाड पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Kolhapur News

Kolhapur Rains: कोल्हापुरातील भटगाव पुलाजवळ अंगावर झाड पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • Kolhapur Rains: कोल्हापुरातील भटगाव पुलाजवळ अंगावर झाड पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Kolhapur News: कोल्हापूरात सोमवारी मध्यरात्री वादळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावा लागले. याच दरम्यान, भटगाव पुलाजवळ बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.  या तरुणाने आदल्या दिवशी त्याचा २६वा वाढदिवस साजरा केला. मात्र, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश धनावडे असे अंगावर झाड पडल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाशने आदल्या दिवशी त्याचा २६वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कामानिमित्त बाहेर गेला होता. काम आटोपल्यानंतर आकाश घराच्या दिशेने निघाला. परंतु, घरापासून अवघे ५०० मीटर दूर असताना आकाशच्या दुचाकीवर बाभळीचे झाड कोसळले. या घटनेत आकाश गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घरातील तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने धनावडे कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले. आकाशच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.

विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अक्षरशः झोडपून काढले. या वादळी पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील अर्ध्या तासासाठी खंडित झाला होता. मंगळवारी सकाळीदेखील अनेक भागात ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा