मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘खेड तालुक्यात बंडाळी झाली तेव्हा कुणी निषेध नव्हता केला’; खासदार आढळराव पाटील यांचा घरचा आहेर

‘खेड तालुक्यात बंडाळी झाली तेव्हा कुणी निषेध नव्हता केला’; खासदार आढळराव पाटील यांचा घरचा आहेर

Jun 27, 2022, 06:48 PM IST

    • एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. मात्र, दिड वर्षांपूर्वी खेड तालुक्यातही बंडाळी झाली होती. तेव्हा मात्र, कुठल्यास शिवसैनिकाने अध्यवा पक्षातून याचा निषेध करण्यात आला नव्हता, असा घरचा आहेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षाला दिला आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. मात्र, दिड वर्षांपूर्वी खेड तालुक्यातही बंडाळी झाली होती. तेव्हा मात्र, कुठल्यास शिवसैनिकाने अध्यवा पक्षातून याचा निषेध करण्यात आला नव्हता, असा घरचा आहेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षाला दिला आहे.

    • एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे. मात्र, दिड वर्षांपूर्वी खेड तालुक्यातही बंडाळी झाली होती. तेव्हा मात्र, कुठल्यास शिवसैनिकाने अध्यवा पक्षातून याचा निषेध करण्यात आला नव्हता, असा घरचा आहेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षाला दिला आहे.

Maharashtra political crisis  एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. अनेक मंत्री पक्षाला सोडून शिंदे गटात सामिल झाले आहे. त्यात आता पुण्यातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही पक्षाला घराचा आहेर दिला आहे. खेड तालुक्यात पंचायत समितीच्या राजकारणात जेव्हा बंडाळी झाली होती. तेव्हा कुठलाच शिवसैनिक अथवा पक्षातील नेत्याने राष्ट्रवादीच्या आमदारा विरोधात आवाज नव्हता उठवला, असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

चाकण येथे एका कार्यक्रमात बोलतांना शिवाजी आढळराव पाटील यांनी वरील खंत व्यक्त केली. आढळराव पाटील म्हणाले, शिवसेनेत आता बंडाळी झाली आहे. पण, अशीच बंडाळी ही दिड वर्षांपूर्वी झाली होती. खेड तालुक्यात झालेल्या बंडाळीची दखल पक्षातील कुणीच घेतली नव्हती.

दिड वर्षांपूर्वी खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांनी पक्षाला त्रास दिला. याच मुद्यावरून पाटील यांनी या बंडाळीची आठवण करुन पक्षाला घरचा आहेर दिला. खेड पंचायत समितीचे काम शिवसेनेमुळे झाले. मात्र, त्याचे श्रेय मिळू नये यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेला खटाटोप हा शिवसेनेच्या -हासाचे कारण असल्याचा घाणाघातही त्यांनी केला.

विधान परिषदेच्या निवडणूकीच्या वेळीही हे आमदार शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, नेते विनवणी करत होते. त्यामुळे यांनी मदतदान केले. आता आमच्या विरोधात खेड पंचायत समितीत राजकारण हे आमदार करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा