मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  OPS : महाशक्ती पाठीशी असताना कसली आर्थिक चिंता?; जुन्या पेन्शन योजनेवरून उद्धव ठाकरेंनी सुनावलं!

OPS : महाशक्ती पाठीशी असताना कसली आर्थिक चिंता?; जुन्या पेन्शन योजनेवरून उद्धव ठाकरेंनी सुनावलं!

Mar 14, 2023, 04:52 PM IST

  • Uddhav Thackeray on Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

  • Uddhav Thackeray on Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray on Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभरातील सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील शासकीय यंत्रणा कोलमडल्या आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

'जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला जणू टाळं लागलं आहे. अशा परिस्थितीत सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करणं हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. कर्मचारी संघटनांनी अहंकार सोडून प्रॅक्टिकल विचार करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना टोला हाणला आहे. 'महाशक्ती पाठीशी असताना राज्यातील सरकारवरच भार वाढण्याची चिंता नसावी, असा खोचक टोला उद्धव यांनी हाणला आहे.

'सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणवीस आणि मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे, ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे.

महाशक्तीचा संबंध काय?

शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंतर आपल्यासोबत गेलेल्या आमदारांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम 'महाशक्ती' हा शब्द वापरला होता. ‘एक महाशक्ती आपल्यामागे आहे, त्यामुळं कुणीही घाबरण्याचं कारण नाही’, असं ते म्हणाले होते. ती महाशक्ती भाजप असल्याचं नंतर समोर आलं. त्यामुळं उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीतील अ्न्य पक्षांकडून शिंदे-फडणवीसांवर टीका करताना महाशक्ती या शब्दाचा प्रयोग केला जातो. जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनीही आज तोच शब्द वापरला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा