मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautami Patil : पट्ट्याचा नादच खुळा! कातिल गौतमी पाटील गावात येणार म्हणून..

Gautami Patil : पट्ट्याचा नादच खुळा! कातिल गौतमी पाटील गावात येणार म्हणून..

May 11, 2023, 11:50 PM IST

  • Gautami patil : गौतमीला पाहण्यासाठी एका फॅनने दोन दिवस सुट्टी मागितल्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौतमी पाटील

Gautami patil : गौतमीला पाहण्यासाठी एका फॅनने दोन दिवस सुट्टी मागितल्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Gautami patil : गौतमीला पाहण्यासाठी एका फॅनने दोन दिवस सुट्टी मागितल्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई – महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच हवा झाली आहे. राज्यात सगळीकडे कातील गौतमी पाटीलची चर्चा रंगलेली असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम व राडा हे जणू समीकरणच झाले आहे. राज्यातील राजकीय कार्यक्रम, बर्थ डे असो किंवा उद्घाटन कार्यक्रमसाठी गौतमी पाटीलला खास आमंत्रण दिलं जातं आहे. काही दिवसापूर्वी तर चक्क बैलासमोर गौतमीचा कार्यक्रम पार पडला.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

आता राज्यात पुरुषांबरोबरच महिलाही गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी करत आहेत. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरूण वर्ग उतावळा होत असताना आहे. त्यातच आता गौतमीची चर्चा एका वेगळ्याच कारणाने सुरू झाली आहे. गौतमीला पाहण्यासाठी एका फॅनने दोन दिवस सुट्टी मागितल्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमीचा हा फॅन एसटी महामंडळाचा कर्मचारी असून सांगली जिल्ह्यातील तासगाव आगारात कार्यरत आहे. 

गौतमीला एकदा तरी पाहता यावं म्हणून या तिच्या जबरा फॅनने एसटी आगारात दोन दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. त्याचा हा अर्ज समोर आला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या सुट्टीच्या अर्जावर ११ मे २०२३ ही तारीख दिसत आहे. अर्ज करणारा कर्मचारी हा एसटी आगारात चालक म्हणून काम करतोय. त्यानं २२  मे आणि २३ मे २०२३ रोजी सुट्टी हवी असल्याचं नमूद केलं आहे. २  दिवसांच्या सुट्टीची त्यानं विनंती केलीये आणि विशेष म्हणून सुट्टीचं कारण त्यानं मोठ्या ठळक अक्षरात लिहिलंय. "गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी", असं त्यानं स्पष्ट लिहिलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा