मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Raid: नाशिकच्या बिल्डरांचे बेहिशेबी घबाड उघड; आयकरच्या छाप्यात ३,३३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Nashik Raid: नाशिकच्या बिल्डरांचे बेहिशेबी घबाड उघड; आयकरच्या छाप्यात ३,३३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Apr 26, 2023, 10:33 AM IST

    • Nashik Income Tax Raid: नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने बिल्डरांच्या बेहिशेबी संपत्तीवर छापेमारी केली होती. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली.
Nashik Income Tax Raid

Nashik Income Tax Raid: नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने बिल्डरांच्या बेहिशेबी संपत्तीवर छापेमारी केली होती. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली.

    • Nashik Income Tax Raid: नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने बिल्डरांच्या बेहिशेबी संपत्तीवर छापेमारी केली होती. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली.

नाशिक : नाशिक येथे जवळपास २० ते २५ बिल्डरांवर आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. नाशिक सह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयात देखील छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत तब्बल ३ हजार ३३३ कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार आयकर विभागाने उघडकीस आणले. तसेच साडेपाच कोटींची रोख रक्कम आणि काही दागिनेही जप्त करण्यात आले. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Amit Shah : पडद्यामागे काहीतरी घडतंय?; अमित शहा १५ दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, चर्चांना उधाण

आयकर विभागाने मंगळवारी नाशिकच्या बड्या बिल्डरांवर ही कारवाई केली. ५० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर वर छापे टाकले. या छापेमरीत एका बड्या लॉटरी व्यावसायिकाकडे ७० ते ८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

नाशिकसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथी देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या तब्बल २२५ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. बुधवारी (दि १९) शिर्डी येथे कारवाई करण्यात आली. अतिशय गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या वाहनातून दाखल होत पहाटे ६ पासून ही कारवाई करण्यात येत होती. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती लागली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा