मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Live: चार दिवसांत राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होणार - IMD
IMD

Maharashtra Rain Live: चार दिवसांत राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होणार - IMD

Jul 14, 2022, 10:51 PMIST

Mumbai Rain Live Update: राज्यातील विविध भागांत पाऊस सुरूच असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Jul 14, 2022, 10:51 PMIST

पुण्यातील वडगाव मुळशी गावात जमिनीला भेगा, नागरिकांत भीतीचे वातावरण

दोन दिवसांच्या सतंतधार पावसाने पुण्यातील वडगाव मुळशी गावात जमिनीला भेगा पडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील ५ कुटूंबांना गावातील शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.

<p>जमिनीला पडलेल्या भेगा</p>
जमिनीला पडलेल्या भेगा

Jul 14, 2022, 06:56 PMIST

Pune Rain Update: पुण्यात आज दिवसभरात दहा ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या

 पुणे शहरात आज दिवसभरात दहा ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली. ही ठिकाणं पुढीलप्रमाणे…

१) दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आवार २) वाकडेवाडी, इराणी वस्ती

३) कोंढवा खुर्द, दत्त मंदिरासमोर ४) वानवडी, आझादनगर

५) औंध, परिहार चौक ६) एरंडवणा, इन्कम टॅक्स गल्ली

७) औंध रोड, शेवाळे हॉस्पिटल ८) भवानी पेठ, जुना मोटार स्टँड

९) हांडेवाडी रोड, सातवनगर १०) कात्रज, भाजी मंडई

Jul 14, 2022, 06:11 PMIST

IMD Alert: पुढील चार दिवसांत महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होणार

मॉन्सून ट्रफ पुढील काही दिवसांमध्ये सध्याच्या स्थितीपेक्षा उत्तरेकडे सरकणार. पुढील ३-४ दिवसांत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होणार, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

Jul 14, 2022, 06:04 PMIST

Pune Dams Water Level: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर

पुणे शहराबरोबरच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आजही खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं १०० टक्के भरलं आहे. तर, पुढील दोन दिवस पावसाचा इशारा असल्यानं खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्यूसेक आणि मुठा नदीत सांडव्यातून ४७०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आहे. तर, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या ४ धरणांचा पाणीसाठा ५० टक्के झाला आहे.

खडकवासला ५ मिमी,  पानशेत २५ मिमी, वरसगाव २१ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १४.६८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी हा साठा ९.०८ टीएमसी होता. मागील वर्षापेक्षा हा साठा ५.५० टीएमसी जास्त आहे.

Jul 14, 2022, 05:17 PMIST

Tansa Dam: तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाची पाणी पातळी १२८.१७ मी. इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पाऊस सुरू असून धरण परिसरातील सध्याचं पावसाचं प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2022, 04:07 PMIST

Pune Rain Update: पुण्यात पावसाचं धुमशान सुरू; जुन्नरमध्ये अनेक दुर्घटना

पुणे जिल्ह्याच्या बहुतेक तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. जुन्नर तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळत असून बंधारा फुटणे, भात खाचरेही खचण्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

Jul 14, 2022, 04:07 PMIST

Pune Rain: मुळशी तालुक्यात पावसाचा जोर कायम; एका तासांत ४३ मिमी पाऊस

मुळशीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे लोणावळा धरण जलाशय पातळी सायंकाळी १५:०० वा ४.७५ मी आणि साठा ९.२० दलघमी (७८.४५टक्के ) झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या १ तासात ४३ मीमी पर्ज्यन्यमान झाला आहे. पूढील २४ तासांत सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. धरण प्रशासनाने कुणी कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना दिल्या आहेत.

Jul 14, 2022, 04:07 PMIST

Konkan Rain update: कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वे मार्गावरील अंजनी ते चिपळूण दरम्यान ट्रॅकवर दरड कोसळली आहे. त्यामुळं मागील दीड तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळं रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. रेल्वे रुळांवरील मातीचे ढिगारे बाजूला काढण्याचं काम सुरू आहे.

Jul 14, 2022, 03:32 PMIST

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील काही भागात तसेच खडकवासला धरण आणि सिंहगड किल्ला परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वीजपुरवठाही खंडीत झाला आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे. या परिसरातील नागरिकांना आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणेला तातडीनं सूचना द्याव्यात, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

Jul 14, 2022, 10:57 AMIST

Mumbai Rain Update: मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2022, 10:10 AMIST

Pune: पुण्यात वाड्याची भिंत कोसळली; ११ जणांची सुखरूप सुटका

पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावठाण, दत्त मंदिरासमोर वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडल्यानं इतर तीन घरांतील ११ रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या मदतीनं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. यात कुणीही जखमी झालेलं नाही.

Jul 14, 2022, 09:18 AMIST

Palghar Rain: वैतरणा नदीत अडकलेल्या दहा कामगारांची एनडीआरएफच्या जवानांनी केली सुटका

पालघर जिल्ह्यात वैतरणा नदीत अडकलेल्या जीएमआर इन्फ्रा कंपनीच्या दहा कामगारांची सुखरूप सुटका करण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. बुधवारी रात्रभर त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते.

Jul 14, 2022, 09:12 AMIST

JayakWadi dam updates: जायकवाडी धरण ५० टक्के भरलं!

<p>Jayakwadi Dam Water Level</p>
Jayakwadi Dam Water Level

    शेअर करा