मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 22 September Live: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी
Congress President Election (Hindustan Times)

Marathi News 22 September Live: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी

Sep 22, 2022, 05:44 PMIST

Marathi News Live Updates: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Sep 22, 2022, 05:44 PMIST

पुण्यातील वारजेमध्ये आप कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांचा अडवला ताफा

पुणे – महागाई, जीवनावश्यक वस्तुंवर लावण्यात आलेली जीएसटी, शेतकरी व जनतेविरोधी आर्थिक धोरणे यांचा निषेध नोंदवत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण याचा ताफा वारजे येथे अडवला. यावेळी कार्यकर्त्यांकडून महागाई व भाजपच्या ऑपरेशन लोटसविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Sep 22, 2022, 03:38 PMIST

Aurangabad: औरंगाबादमधील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव साळवे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं. संघर्ष सोनवणे, विक्की चावरीय यांनीही शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला.

Sep 22, 2022, 03:12 PMIST

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गरज भासल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक घेतली जाईल व त्याचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.

Sep 22, 2022, 11:39 AMIST

Chandrashekhar Bawankule: शिवसेनेचा उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू - बावनकुळे

भाजपमुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळं तुम्हाला जनतेनं वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झालं पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Sep 22, 2022, 11:29 AMIST

Coronavirus: मागील २४ तासांत देशात ५४४३ नवे करोना रुग्ण

गेल्या २४ तासांत देशभरात ५४४३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ५२९१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४६ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Sep 22, 2022, 10:40 AMIST

Dasara Melava: मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाइव्ह करा; भाजपचा उद्धव ठाकरे यांना टोला

शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ देण्यास भाजपनं विरोध केला आहे. 'एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते. आता ना बाळासाहेब, ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केलं, असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हाणला आहे.

Sep 22, 2022, 09:46 AMIST

Share Market: शेअर बाजारात विक्रीचा ट्रेंड कायम; सेन्सेक्स १५० हून अधिक अंकांनी खाली 

शेअर बाजारात विक्रीचा जोर सुरूच आहे. त्यामुळं सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंकांनी घसरला आहे. तर, निफ्टी ७१ अंकांनी घसरून १७,६४० च्या आसपास ट्रेड करत आहे.

Sep 22, 2022, 09:35 AMIST

Pune crime : मार्केट यार्ड परिसरात तरुणाला लुटले ; मारहाण करुन मोबाइल हिसकावला

मार्केट यार्ड भागातील वखार महामंडळ चौकात तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत मोहसीन अन्सारी (वय २३, रा. मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी रात्री मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकातून निघाला होता. त्या वेळी तिघा चोरट्यांनी अन्सारीला अडवले. त्याला मारहाण करुन मोबाइल संच हिसकावला. अन्सारीला मारहाण करुन पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

Sep 22, 2022, 09:33 AMIST

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यू

मेक्सिकोमध्ये गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी बंदूकधारी व्यक्तीने सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

Sep 22, 2022, 08:46 AMIST

Raj Thackeray Amravati Visit : राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर

Raj Thackeray Amravati Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज अमरावतीत जाणार असून तेथील अंबादेवीचं दर्शन घेणार आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यातील मनसैनिकांसोबत बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

Sep 22, 2022, 08:14 AMIST

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री शाह यांच्यात दिल्लीत भेट; काय झाली चर्चा?

CM Eknath Shinde Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीत २० मिनिटं भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी काही खासदारही त्यांच्यासोबत होते. त्यामुळं आता आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक आणि कोर्टाच्या निकालाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं समजतं.

Sep 22, 2022, 08:09 AMIST

Raju Srivastav : राजू श्रीवास्तव यांच्यावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार

Raju Srivastav Death : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं काल दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. व्यायाम करताना त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानं मनोरंजन शोककळा पसरली असून अनेक लोकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Sep 22, 2022, 07:38 AMIST

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत

मुंबई, : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे हक्क बाधीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

Sep 22, 2022, 07:37 AMIST

Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा 'यलो' अलर्ट; राज्यात पावसाचा जोर ओसरला

हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. राज्यात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 22, 2022, 07:33 AMIST

Shivsena Dasara Melava: शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा; हायकोर्टात आज फैसला

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसाठी महानगर पालिकेला परवानगी मागूनही ती न मिळाल्याने ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जाववर आज सुनावणी होणार आहे. यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा या बाबत कोर्ट काय निकाल देत या राज्याचं लक्ष लागलं आहे.

    शेअर करा