मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 19 January 2023 Live: धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Dhananjay Munde

Marathi News 19 January 2023 Live: धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Jan 19, 2023, 03:44 PMIST

Dhananjay Munde : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Jan 19, 2023, 03:44 PMIST

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलानं प्रवासी जहाजातून केली ६५ वर्षीय अमेरिकी रुग्णाची सुटका. उपचारासाठी केलं रुग्णालयात दाखल

भारतीय तटरक्षक दलानं आज पहाटे मुंबईतील वर्ल्ड ओडिसी या प्रवासी जहाजातून ६५ वर्षीय अमेरिकन रुग्णाची सुटका केली. मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे २३० नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या एमव्ही वर्ल्ड ओडेसी क्रूझमधून मेरिटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर मुंबई (MRCC) ला मदतीची विनंती करण्यात आली होती. जहाजावरील जेम्स डग्लस शर्ली या ६५ वर्षीय अमेरिकी नागरिकाला डोळ्यांचा गंभीर त्रास असल्याचं व त्याला तातडीनं शस्त्रक्रियेची गरज असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर तटरक्षक दलाचं C-439 जहाज वैद्यकीय पथकासह रवाना करण्यात आलं आणि संबंधित रुग्णाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं.

Jan 19, 2023, 01:21 PMIST

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परळीमध्ये झालेल्या अपघातानंतर मागील १६ दिवसापासून ते रुग्णालयात होते. या काळात पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस होती.

Jan 19, 2023, 01:18 PMIST

Share Market Updates : शेअर बाजाराचा यू टर्न, सेन्सेक्समध्ये घसरण

मागील काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या शेअर बाजारात आज वेगळं चित्र आहे. सेन्सेक्समध्ये किंचित घसरण झाली असून निफ्टी आणि बँक निफ्टीही काही अंकांनी घसरून ट्रेड करत आहेत.

Mumbai Share Market news
Mumbai Share Market news (MINT_PRINT)

Jan 19, 2023, 12:19 PMIST

Hindu jan akrosh morcha : हिंदू जन आक्रोश मोर्चाचे रविवारी आयोजन

सकल हिंदू समाजातर्फे येत्या रविवारी (२२ जानेवारी) हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी  याबाबत माहिती दिली.  

Jan 19, 2023, 10:35 AMIST

PM Modi Visit Mumbai :असा असेल पंतप्रधान मोदींचा मुंबई दौऱ्यातील कार्यक्रम

दुपारी ४.४० : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी याचे मुंबई विमानतळावर आगमन

सायं. ५ : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई

सायं. ६.३० : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई

सायं.७.२० : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ

Jan 19, 2023, 12:19 PMIST

Mahavikas  aaghadi : महाविकास आघाडीची आज होणार पत्रकार परिषद

मुंबई :  महावीकस आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज  दुपारी बारा वाजता  पत्रकार परिषद होणार असून  यावेळी नाशिक आणि नागपूर संदर्भातील घोषणा केली जाईल. अखेर चर्चेअंती उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

Jan 19, 2023, 05:39 AMIST

Pune Osho Ashram : पुण्यात ओशो आश्रम प्रशासनाविरोधात भाविकांचे  आंदोलन

पुणे - ओशो आश्रम आंदोलन...आचार्य ओशो रजनीश यांच्या ३३  व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त आश्रमाच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, आश्रम प्रशासनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) भक्तांना समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही असा दावा करत ओशो भक्त आज सकाळी ११ वाजता ओशो आश्रमाजवळ निषेध आंदोलन करणार आहेत.

Jan 19, 2023, 05:37 AMIST

PM Modi Visit Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; विविध विकास कामांचे होणार उद्घाटन

PM Modi Visit Mumbai : विविध विकास कामांच्या उद्घघाटन आणि भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. त्यांच्या हस्त महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण, रुग्णालयांच्या इमारती, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण या कामांचे भूमिपूजन होणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसी सभा घेणार आहेत. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

    शेअर करा