मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Section 144 in Mumbai: शिवसैनिकांमध्ये संताप; मुंबईत कलम १४४ लागू

Section 144 in Mumbai: शिवसैनिकांमध्ये संताप; मुंबईत कलम १४४ लागू

Jun 25, 2022, 02:42 PM IST

    • ठाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
शिवसेना भवनावर आज शिवसेना कार्यकारिणीची बैठक (फोटो - गिरीश श्रीवास्तव)

ठाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    • ठाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुण्यात (Pune) बालाजीनगरमध्ये आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे कार्यालय शिवसैनिकांकडून फोडण्यात आले. दरम्यान, मुंबई शहरात मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Salman Khan firing Case: सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीची आत्महत्या

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

मुंबई पोलिसांचे कायदा सुव्यवस्था उपायुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेण्यात आली. शिंदे गटातील आमदार व नेते यांच्याही घराबाहेर आणि निवासस्थानी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

ठाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीत इतर आमदारांसह आहेत. आज सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या गटाची पत्रकार परिषद असून यात गटाचे नवे नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात सुरू आहे. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.