मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Revolt Live: छगन भुजबळ यांनाही करोनाची लागण
Chhagan Bhujbal

Shiv Sena Revolt Live: छगन भुजबळ यांनाही करोनाची लागण

Jun 27, 2022, 06:44 PMIST

शिवसेनेकडून केलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Jun 27, 2022, 06:44 PMIST

Chhagan Bhujbal Covid Positive: अजित पवार यांच्यानंतर आता छगन भुजबळ यांनाही करोनाची लागण

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादानं करोनावर मात करून लवकरच मी बरा होईन. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणं दिसल्यास तात्काळ करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं आवाहन छगन भुजबळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

Jun 27, 2022, 05:15 PMIST

Eknath Shinde Tweet: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचं ट्वीट

हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!, असं ट्वीट बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Jun 27, 2022, 04:56 PMIST

कायदेशीर लढाईला सामोरं जाऊ; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील कायदेशीर लढाई लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी आता ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यावर कायदेशीर लढाईला सामोरं जाऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Jun 27, 2022, 04:48 PMIST

Chandrakant Patil on Shiv Sena Split: सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न - चंद्रकांत पाटील

सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेच्या दोन गटांतील हे भांडण आहे. त्यावर आम्ही बोलणं चुकीचं आहे. एकनाथ शिंदे कोणत्या महाशक्तीबद्दल बोलत आहेत माहीत नाही - चंद्रकांत पाटील

Jun 27, 2022, 04:48 PMIST

Supreme Court on Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही, असं शिंदे गटानं म्हटलं होतं. त्यावर तुम्ही हायकोर्टात का गेला नाहीत, असा सवाल न्यायालयानं शिंदे गटाला विचारला आहे.

Jun 27, 2022, 12:55 PMIST

Kolhapur: कोल्हापुरात राजेंद्र पाटील-यड्रावरकर व शिवसैनिक आमनेसामने

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बंडखोरी केल्यामुळं कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. यड्रावकर समर्थक व शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. शिवसैनिकांचा मोर्चा यड्रावकरांच्या कार्यालयसमोरून जात असताना दोन्ही गट समोरासमोर आले.

Jun 27, 2022, 12:55 PMIST

Sanjay Raut: ईडीचं समन्स अद्याप मिळालेलं नाही - संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणात ईडीनं समन्स बजावल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप आपल्याला समन्स मिळालेलं नाही. तसं समन्स आल्यास वेळ वाढवून मागेन, असं त्यांनी म्हटलं आहे.

Jun 27, 2022, 12:44 PMIST

Anil Gote: बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतंय?; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे ईडी कार्यालयात जाणार

पक्षाविरोधात बंड करून २१ जूनपासून आसाममधील गुवाहाटीत वास्तव्याला असलेल्या आमदारांचा खर्च कोण करतंय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. गोटे यांनी राज्याचे गृह सचिव, मुख्य सचिव आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याकडं ही मागणी केली असून उद्या थेट मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन विचारणा करणार आहे, अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे.

Jun 27, 2022, 12:44 PMIST

Eknath Shinde Vs Shiv Sena: शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची लढाई सर्वोच्च न्यायालयात. थोड्याच वेळात सुनावणी

एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत बाजू मांडणार असून शिंदे गटाकडून हरीश साळवे, मुकुल रोहोतगी, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करणार आहेत. 

Jun 27, 2022, 12:44 PMIST

Nilesh Rane: उद्धव ठाकरे यांनी आता स्वत:च्या गटाचं नाव 'शिल्लक सेना' ठेवावं - नीलेश राणे

 एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव "शिवसेना" ऐवजी "शिल्लक सेना" करून घ्यावं, असा टोला माजी खासदार नीलेश राणे यांनी हाणला आहे.

Jun 27, 2022, 12:44 PMIST

Maharashtra Political Crisis Live: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून दोनवेळा चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राज्यातील राजकीय परिस्तितीबाबत चर्चा झाली असून एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूसही केली असल्याची माहिती मनसे नेत्याने दिली आहे.

Jun 27, 2022, 12:43 PMIST

Maharashtra Political Crisis Live: कार्यालये फोडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक किती आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किती? केसरकरांचा सवाल

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी कार्यालयांच्या होणाऱ्या तोडफोडीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. तोडफोड करणाऱ्यांमध्ये किती शिवसैनिक आणि किती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते? असं विचारत हे तपासून पहावं लागेल असं ते म्हणाले. पवारसाहेबांना उद्धव ठाकरे भेटल्यानंतर त्यांचे विचार बदलल्याचंही केसरकर यांनी म्हटलं.

Jun 27, 2022, 12:43 PMIST

Maharashtra Political Crisis Live: प्रवीण दरेकर यांनी घेतली फडणवीसांची भेट

राज्यातील राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि राम कदम यांनी रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Jun 27, 2022, 12:43 PMIST

Maharashtra Political Crisis Live: बंडखोर आमदारांची कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धाव

शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

    शेअर करा