मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 29 November 2022 Live: राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदत
Police Recruitment

Marathi News 29 November 2022 Live: राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदत

Nov 29, 2022, 03:38 PMIST

Marathi News Live Updates : राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Nov 29, 2022, 03:36 PMIST

Police Recruitment: राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आतापर्यंत ११ लाख ८० लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 29, 2022, 07:28 AMIST

Supreme Court : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Supreme Court Live Updates : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह अन्य याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं आता या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

Nov 29, 2022, 07:27 AMIST

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपला; गुरुवारी मतदान

gujarat assembly elections : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या एक डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षानं जोर लावला आहे.

Nov 29, 2022, 07:27 AMIST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर

Raj Thackeray In Kolhapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते अंबाबाईचं दर्शन घेणार असून त्यानंतर कोकण दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. यावेळी कोल्हापूर आणि कोकणमधील पक्षसंघटनेची आढावा बैठकही घेणार आहेत.

Nov 29, 2022, 07:25 AMIST

Mumbai Water Cut : मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद; बीएमसीचा मोठा निर्णय

Mumbai Water Cut : मुंबईतील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा संपूर्णत: बंद राहणार आहे. पवई भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या लाईनच्या दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेनं काम हाती घेतलं आहे. त्यामुळं जवळपास अर्ध्या मुंबईत पुढील ४८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे.

    शेअर करा