मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 25 Saptember Live: एकमेकांचे नेते फोडू नका; भाजप हायकमांडच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
Eknath Shinde and Devendra Fadnavis (HT_PRINT)

Marathi News 25 Saptember Live: एकमेकांचे नेते फोडू नका; भाजप हायकमांडच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

Sep 25, 2022, 12:59 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Sep 25, 2022, 12:59 PMIST

Ajit Pawar : मी आईला भेटताना फोटो काढत नाही, अजित पवारांचा मोदींना टोला

Ajit Pawar In Baramati : मी नेहमी बारामतीला येतो. आईला भेटायला जातो, परंतु त्याचा फोटो काढत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Sep 25, 2022, 08:54 AMIST

Shinde Group vs BJP : 'एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नका', शिंदे-फडणवीस सरकारला हायकमांडचा आदेश

Shinde Group vs BJP : भाजपच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत शिंदे गटात प्रवेश केल्यानं आता याची दखल केंद्रीय भाजपमध्ये घेण्यात आली आहे. कारण आता शिंदे-फडणवीस सरकारला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांचे नेते आणि कार्यकर्ते फोडू नयेत, अशा सूचना केल्या आहेत. त्यानंतर आता भाजपचे मंत्री सतर्क झाले असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.

Sep 25, 2022, 07:38 AMIST

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत, हैदराबादमध्ये रंगणार सामना

Ind vs Aus T20 Match : भारत आणि ऑस्ट्रेलियात आज फायनल T20 सामना हैदराबादमध्ये होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानं १-१ ची बरोबरी साधलेली आहे. त्यामुळं आता दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नानं मैदानावर उतरणार आहे.

Sep 25, 2022, 07:35 AMIST

Nitish Kumar Delhi Visit : नितीश कुमार आणि सोनिया गांधींची दिल्लीत होणार भेट

Nitish Kumar Delhi Visit : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज दिल्ली दौऱ्यावर असून ते आज कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादवही असणार आहेत. त्यामुळं आता आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राजद आणि जेडीयूची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sep 25, 2022, 07:26 AMIST

Jammu And Kashmir : गुलाम नबी आझाद काढणार नवा पक्ष

Jammu And Kashmir : काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे नवा पक्ष काढणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज श्रीनगरमध्ये ते नव्या पक्षाची घोषणा करू शकतात.

    शेअर करा