मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 17 November 2022 Live: नवी मुंबईत वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आग, चार गाळे खाक
Fire incident in Vashi APMC Market in Navi Mumbai

Marathi News 17 November 2022 Live: नवी मुंबईत वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आग, चार गाळे खाक

Nov 17, 2022, 06:04 PMIST

Marathi News Live Updates : नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आग लागली आहे. आगीमुळे ४ गाळे जळून खाक झाले आहेत. मार्केटमधील N रो मध्ये आग लागली आगे. फळे ठेवण्यासाठीच्या पुट्ठ्यांमुळे आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

Nov 17, 2022, 06:07 PMIST

Rahul Gandhi: हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवा; राहुल गांधी यांचं भाजपला आव्हान

हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवा; असं आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेलाही राहुल यांनी उत्तर दिलं. सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेली पत्रं फडणवीसांनी वाचावीत, असा टोलाही राहुल गांधी यांनी हाणला.

Rahul Gandhi speaking to journalists in Akola
Rahul Gandhi speaking to journalists in Akola

Nov 17, 2022, 11:51 AMIST

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी दादरमध्ये व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केलं. ते थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

Nov 17, 2022, 11:19 AMIST

हिमाचल प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी; तब्बल १०० रस्ते वाहतुकीसाठी बंद 

हिमाचल प्रदेशातील उंच, डोंगराळ भागात गेले तीन दिवस प्रचंड बर्फवृष्टी होतेय. परिणामी लाहौल, स्फीती, कुलू या भागातील दऱ्यांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. यात घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Heavy snowfall in the higher reaches of Himachal Pradesh. 100 roads blocked.
Heavy snowfall in the higher reaches of Himachal Pradesh. 100 roads blocked.

Nov 17, 2022, 08:07 AMIST

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील ११ वा दिवस, राहुल गांधीची दुपारी पत्रकार परिषद

भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील ११ वा दिवस असून विदर्भातला तिसरा दिवस आहे. आज अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथून यात्रेला सुरुवात झाली असन वाळेगाव मार्गे यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. आज दुपारी एक वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत.

Nov 17, 2022, 08:00 AMIST

इराणमध्ये बेछूट गोळीबार;५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

इराणमधील सेंट्रल मार्केटमध्ये हल्लोखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. दक्षिण पश्चिम इराणच्या इजेह शहरात ही घटना घडली आहे.

    शेअर करा