मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 17 August 2022 Live: विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार
Vinayak Mete

Marathi News 17 August 2022 Live: विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार

Aug 17, 2022, 06:03 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 17, 2022, 05:51 PMIST

Vinayak Mete Death: विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश

'शिवसंग्राम' संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. अपघाताच्या त्या दोन तासांत काय झालं याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Aug 17, 2022, 04:40 PMIST

Ashish Shelar: मोहित कंबोज यांचा स्ट्राइक रेट शंभर टक्के आहे. पुराव्याशिवाय ते आरोप करणार नाहीत - आशिष शेलार

मोहित कंबोज यांनी आज केलेलं ट्वीट हे स्वयंस्पष्ट आहे. त्यांचा स्ट्राइक रेट शंभर टक्के आहे. ते माहितीशिवाय काही बोलणार नाहीत. आजपर्यंत त्यांनी पुराव्यासह अनेक भ्रष्टाचाराचे विषय मांडले आहेत, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

Aug 17, 2022, 04:03 PMIST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: क्रीडापटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांचा रेल्वेकडून गौरव

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये यथोचित गौरव केला. याच कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक जी. व्ही.सत्यकुमार यांनी धावक ऍलेक्स सिल्व्हेरा आणि हॉकीपटू सतिंदरपाल वालिया या दोन दिग्गजांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून मुंबई सेंट्रल कार्यालयात गौरव केला.

<p>Alex Sequeira</p>
Alex Sequeira

Aug 17, 2022, 03:35 PMIST

Janata Dal (Secular): राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पोलीस व्हॅन सुरक्षा व्यवस्था पुरवावी;  जनता दल (सेक्युलर) पक्षाची मागणी 

राज्यात अनेक राजकीय पक्ष कार्यरत आहेत. त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना सतत जनतेच्या कामानिमित्त मंत्रालयासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात दौरे करावे लागतात. यावेळी प्रवास करताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने घातपात किंवा अपघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना पोलीस व्हॅन सुरक्षा मिळावी, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडं केली आहे.

Aug 17, 2022, 12:03 PMIST

Share Market: सेन्सेक्सने ओलांडला ६० हजारांचा टप्पा

सध्या शेअर बाजारात तेजी दिसत असून सेन्सेक्सने ४ महिन्यांनी पुन्हा ६० हजारचा टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजाराच्या सुरवातीला सेन्सेक्सने तासाभराताच दीडशेहून अधिक अंकांनी उसळी घेत ६० हजारांचा आकडा ओलांडला.

Aug 17, 2022, 10:57 AMIST

इलॉन मस्क खरेदी करणार ‘मँचेस्टर युनायटेड क्लब’

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात म्हटलं की, "इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड खरेदी करणार आहे." याआधी त्यांनी ट्विटर खरेदीचं ट्विट केलं होतं, मात्र काही कारणांनी ट्विटर खरेदीचा करार त्यांनी रद्द केला. त्यामुळे आता मँचेस्टर युनायटेड खरेदी करणार का? याची चर्चा सुरू आहे.

Aug 17, 2022, 10:22 AMIST

Grenade Attack On Indian Army : काश्मिरमध्ये सैन्यावर ग्रेनेड फेकून दशतवादी पळाले; जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू!

Grenade Attack On Indian Army In Kashmir : दोन दिवसांपूर्वीच काश्मिरच्या कुलगाममध्ये अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस शहीद झाले होते, त्यानंतर आता कुतपोरामध्ये दहशतवाद्यांनी सैन्यावर ग्रेनेड फेकून पळाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं असून एका ठिकाणी लपून ठेवलेला शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Aug 17, 2022, 09:59 AMIST

Share Market: शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल सुरूच

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसत असून सेन्सेक्स व निफ्टी वधारत आहेत. आजही सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १५० हून अधिक अंकांनी वधारला आहे तर, निफ्टी ५० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Aug 17, 2022, 09:02 AMIST

Anupam Kher On Kashmiri Pandit : काश्मिरी पंडितांवर हल्ले सुरूच; अनुपम खेर यांची केंद्रावर नाराजी!

Anupam Kher On Kashmiri Pandit : गेल्या काही दिवसांपासून काश्मिरमध्ये प्रशासनात काम करणाऱ्या नोकरदारांवर आणि इतर लोकांवर हल्ले सुरू आहे, यावर आता अभिनेते अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त करत केंद्रावर टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना खेर यांनी काश्मिर खोऱ्यात होणाऱ्या हिंसाचाराचा आणि नागरिकांच्या हत्येचा निषेध केला आहे, याशिवाय अजूनही खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरूच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Aug 17, 2022, 07:55 AMIST

राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार, सिंचन घोटाळ्यावरून मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असं सूचक ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. २०१९ मध्ये या नेत्याच्या सिंचन घोटाळ्याची फाइल बंद केली होती असंही कंबोज यांनी म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या बेनामी कंपन्या, त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावरची संपत्ती, भ्रष्टाचार याची माहिती लवकरच पत्रकार परिषदेत देणार असंही कंबोज यांनी म्हटले आहे.

Aug 17, 2022, 07:50 AMIST

Monsoon Session: राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून

शिवसेनेत बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून ते २५ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान, पूरस्थिती, वादग्रस्त आमदार आणि मंत्री, राज्यपाल नियुक्त १२ नावांच्या मुद्यांवर घेरण्याची शक्यता आहे.

Aug 17, 2022, 08:11 AMIST

Gondia Train Accident : गोंदियात रेल्वेचा डबा रुळावरून घसरला, ५० प्रवासी जखमी

गोंदिया शहराजवळ भगत की कोठी या ट्रेनचा अपघात झाला आहे. रायपूरहून नागपूरला जात असणाऱ्या रेल्वेचा एक डब्बा रूळावरून घसरल्याने ५० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

    शेअर करा