मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 14 October 2022 Live: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Rutuja Latke

Marathi News 14 October 2022 Live: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 14, 2022, 05:10 PMIST

Marathi News Live Updates : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीनं ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Oct 14, 2022, 05:10 PMIST

Mumbai Rain: मुंबई शहर, उपनगरासह ठाणे जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस

मुंबई शहर, उपनगरासह ठाणे जिल्ह्याच्या काही भागांत मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पावसाबरोबर हवेचा जोरही वाढला आहे.

Oct 14, 2022, 03:09 PMIST

Murji Patel: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांनी भरला अर्ज

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिंदे गटाचे दीपक केसरकर, दिलीप लांडे, भाजपचे नीतेश राणे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित होते.

Oct 14, 2022, 03:00 PMIST

 Jayant Patil: सत्ता गेली तरी आपले सत्व शाबूत आहे, त्यामुळं पुन्हा सत्तेत येऊ - जयंत पाटील

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे. आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा. येत्या दीड - दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जळगाव शहर व जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

Oct 14, 2022, 02:35 PMIST

Andheri Bypoll: शिवसेनेच्या वतीनं ऋतुजा लटके यांनी भरला उमेदवारी अर्ज

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीनं ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील हे यावेळी उपस्थित होते.

Oct 14, 2022, 12:46 PMIST

NCP: अखेर एकनाथ शिंदे कमळापुढे झुकले - राष्ट्रवादी काँग्रेस

स्वतःच्या गटाला ओरिजनल शिवसेना म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांनी अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देऊन अखेर कमळापुढे झुकत असल्याचं जाहीर केलं आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. शिवसेनेतील बंडानंतर राज्यामध्ये होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असून शिंदे गटानं त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात का उतरवला नाही, असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

Oct 14, 2022, 10:57 AMIST

Gujarat Election Dates : गुजरात आणि हिमाचलच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची आज होणार घोषणा

Gujarat Election Dates 2022 : केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळं या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आज बिगुल वाजण्याची शक्यता असल्यानं या पत्रकार परिषदेकडे अनेक राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे.

Oct 14, 2022, 10:12 AMIST

फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद; ३ हजार २२४ नोंदी निकाली 

पुणे : सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ३ हजार २२४ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या. राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार बुधवार १२ ऑक्टोबर रोजी आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून या फेरफार अदालतीमध्ये साध्या २ हजार ५८७ , वारस ४८७ आणि तक्रारी १५० अशा एकूण ३ हजार २२४ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

Oct 14, 2022, 10:02 AMIST

Vinayak Raut : विनायक राऊतांवर गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरल्याचा शिंदे गटाचा आरोप

Vinayak Raut vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. गडचिरोलीतील मुलचेरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं आता विनायक राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Oct 14, 2022, 10:08 AMIST

stock Market: शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला

मागील काही दिवसांपासून सातत्यानं घसरत चाललेला शेअर बाजार आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच सावरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला असून निफ्टी २५० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Oct 14, 2022, 07:56 AMIST

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, ईडीचा सुटकेला विरोध

Anil Deshmukh vs ED : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळं आज त्यांना जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे ईडीनं देशमुखांच्या जामीनाचा विरोध केला असून त्यावर कोर्ट काय निकाल देणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

Oct 14, 2022, 07:24 AMIST

Murji Patel : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी

andheri bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शिवसेनेकडूनही ऋतुजा लटकेंचं नाव फायनल झाल्यानं ही लढत थेट भाजप विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे.

    शेअर करा