मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 02 December 2022 Live : मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र डबा राखून ठेवा;कोर्टात जनहीत याचिका
Share Market

Marathi News 02 December 2022 Live : मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र डबा राखून ठेवा;कोर्टात जनहीत याचिका

Dec 02, 2022, 12:45 PMIST

Marathi News Live Updates : गेल्या काही दिवसांपासून सतत तेजीत असलेल्या शेअर बाजारानं आज अचानक उलटा प्रवास सुरू केला आहे. सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी घसरला आहे.

Dec 02, 2022, 12:45 PMIST

Stock Market: शेअर बाजारात अचानक मोठी घसरण, सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला

गेल्या काही दिवसांपासून सतत तेजीत असलेल्या शेअर बाजारानं आज अचानक उलटा प्रवास सुरू केला आहे. सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी घसरला आहे.

Dec 02, 2022, 08:14 AMIST

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Dec 02, 2022, 08:14 AMIST

जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षेचा निकाल घोषित

सहकार आणि लेखा विषयात पदविका (जी.डी.सी.अँड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा २०२२ चा निकाल घोषित करण्यात आला असून फेरगुण मोजणीकरीता https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षार्थींना हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन व पासवर्डचा उपयोग करुन पाहता येईल. तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील महत्वाचे दुवे मधील 'जी.डी.सी. अॅण्ड ए. मंडळ' या टॅबवर थेट पाहता येणार आहे.

Dec 02, 2022, 08:11 AMIST

माझ्या वडिलांनी कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केलेली; ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

ओसामा बिन लादेनच्या मुलानं असा दावा केलाय की, त्याचे वडील तो लहान असताना त्याला अनेक गोष्टींचं प्रशिक्षण द्यायचे. त्यावेळी तो खूपच लहान होता, त्यावेळी लादेननं त्याला बंदूक चालवायला शिकवलं होतं. एवढंच नाहीतर, त्याच्या कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांंचं परीक्षणही केलं होतं.

Dec 02, 2022, 08:09 AMIST

सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या गोल्डी बराडला अमेरित अटक

पंजाबी गायक आणि कॉँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाइंड असलेला गोल्डी बराड याला कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली आहे.

    शेअर करा