मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 12 March 2023 : देशभरात आज रंगपंचमीचा जल्लोष; विविध कार्यक्रमांचे आयोजन
People play with colours to celebrate the festival of Holi, in Gorakhpur (PTI)

Live News Updates 12 March 2023 : देशभरात आज रंगपंचमीचा जल्लोष; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Mar 12, 2023, 06:25 AMIST

Ranga panchami : देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

Mar 12, 2023, 06:25 AMIST

Azim Premji :  यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान होणार

सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे दानशूर, परोपकारी अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित रहाणार आहेत.

Mar 12, 2023, 06:24 AMIST

Goregaon : गोरेगाव येथे आदित्य ठाकरेंची सभा

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिव गर्जना सभा आहे. गोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात संध्याकाळी ७.३० वाजता ही सभा पार पडणार आहे.

 

Mar 12, 2023, 06:24 AMIST

long March : नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च

माकपच्या वतीने आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च निघणार आहे. आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून दुपारी मार्चला सुरुवात होऊन नाशिक शहरात मुक्काम करणार आहेत. त्यानंतर सोमवारी सकाळी हा मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. अंदाजे १५  हजार शेतकरी यामध्ये सहभागी होतील. 

Mar 12, 2023, 06:17 AMIST

Ranga panchami :देशभरात आज रंगपंचमीचा जल्लोष; विविध कार्यक्रमांचे आयोजन

देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

    शेअर करा