मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana News : धक्कादायक ! धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे कापले मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात

Buldhana News : धक्कादायक ! धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे कापले मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात

Sep 16, 2022, 03:01 PM IST

    • Buldhana News : बुलढाणा आगारातील एका बसचा लोखंडी पत्रा फाटला असतांनाही ती बस बाहेर काढून भरधाव वेगात जात असताना फिरायला जाणाऱ्या दोन तरूणांचे हात या फटलेल्या पत्र्यामुळे कापले गेले. दोघांचीही प्रकृती ही गंभीर आहे. ही घटना मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर आज सकाळी घडली.
बसचा तुटलेल्या या पत्र्यामुळे अपघात झाला आहे,

Buldhana News : बुलढाणा आगारातील एका बसचा लोखंडी पत्रा फाटला असतांनाही ती बस बाहेर काढून भरधाव वेगात जात असताना फिरायला जाणाऱ्या दोन तरूणांचे हात या फटलेल्या पत्र्यामुळे कापले गेले. दोघांचीही प्रकृती ही गंभीर आहे. ही घटना मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर आज सकाळी घडली.

    • Buldhana News : बुलढाणा आगारातील एका बसचा लोखंडी पत्रा फाटला असतांनाही ती बस बाहेर काढून भरधाव वेगात जात असताना फिरायला जाणाऱ्या दोन तरूणांचे हात या फटलेल्या पत्र्यामुळे कापले गेले. दोघांचीही प्रकृती ही गंभीर आहे. ही घटना मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर आज सकाळी घडली.

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात आज बस चलकाच्या निष्काळजीपणामुळे गंभीर घटना घडली आहे. मलकापुर आगारातील एका शिवशाही बसचा पत्रा फाटला असतांनाही चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून ती बस बाहेर काढली. ही बस मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गाने जात असताना या फटलेल्या पत्र्यामुळे फिरायला जात आलेल्या दोन तरुणांचे हात कापले गेले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे हात तुटून पडले असून ५० ते ६० फुट दूर फेकले गेले. दोघांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मलकापूर सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जळगावमधील एका रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील असे या अपघातात जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर आगारातील बस पहाटे साडेपाच वाजता मलकापूरहून पिंपळगावदेवी इथे जाण्यासाठी निघाली होती. या बसचा चालका शेजारील बाजूचा पत्रा हा फाटला होता आणि तो बाहेरच्या बाजूने निघाला होता. या कडे दुर्लक्ष करून चालकाने ही बस आगारा बाहेर काढली. ही बस मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास आली. या ठिकाणी काही मुळे ही पोलिस भरती साठी व्यायाम तसेच सराव करत होती. विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील ही दोघेही सराव करत होते. यावेळी त्यांच्या जवळून ही बस भरधाव वेगात गेली. यामुळे या बसचा बाहेर आलेला पत्रा या दोघांच्या हाताला लागल्याने त्यांचे हात कापले गेले. एवढेच नाही तर ते तुटून तब्बल ५०ते ६० फुटा पर्यन्त फेकले गेले. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मलकापूर सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर जळगाव येथील रुग्णालयात हलवल्यात आले आहे.

सर्वात वाईट बाब म्हणजे अपघात झाल्यावर चालकाने बस थोडा वेळ थांबवली. त्याने जखमी मुलांना पहिले आणि त्यांना तिथेच सोडून चालक निघून गेला. ही घटना समजल्यावर संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल त्यांनी केला. बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी करणे गरजेचे असताना ती न केल्याने दोघांच्या जिवावर बेतले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून बस चालकाला पकडण्यात आले आहे. बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा