मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Majiwada : मद्यधुंद महिला इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून कोसळली, रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मृत्यू

Majiwada : मद्यधुंद महिला इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून कोसळली, रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मृत्यू

Sep 04, 2022, 12:06 PM IST

    • Thane Crime News : इमारतीच्या बाल्कनीला सुरक्षेचे कडे नसल्यानं दारु पिलेली एक महिला इमारतीच्या २० व्या मजल्यावरून कोसळल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.
Thane crime news today in marathi (HT)

Thane Crime News : इमारतीच्या बाल्कनीला सुरक्षेचे कडे नसल्यानं दारु पिलेली एक महिला इमारतीच्या २० व्या मजल्यावरून कोसळल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.

    • Thane Crime News : इमारतीच्या बाल्कनीला सुरक्षेचे कडे नसल्यानं दारु पिलेली एक महिला इमारतीच्या २० व्या मजल्यावरून कोसळल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.

Thane crime news today in marathi : मद्यधुंद अवस्थेत घरात दारुड्या पतीशी गप्पा मारणाऱ्या एका महिलेचा इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं ठाण्यात खळबळ उडाली आहे. कादंबरी तलरेजा असं इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्यावेळी महिलेचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Salman Khan firing Case: सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीची आत्महत्या

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास माजिवाड्यातील लोढा लक्झुरिया कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या कादंबरी तलरेजा या महिलेनं पती संदीप सोबत मद्यपान केलेलं होतं. त्यावेळी तिनं पतीला तिच्यावर किती प्रेम करतो, हे सांगायला लावलं. त्यावेळी पती दारू पिण्यात मग्न होता. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पतीकडे पतीनं लक्ष दिलं नाही. त्यानंतर पतीशी गप्पा मारता मारता कादंबरी या बाल्कनीकडे गेल्या. परंतु तिथं त्यांचा तोल गेला आणि त्या विसाव्या मजल्यावरून खाली कोसळल्या. सुरुवातीला हा प्रकार पतीच्या लक्षात आला नाही. परंतु इमारतीच्या खाली असलेल्या काही लोकांनी महिलेचा मृतदेह पाहताच त्यांना मोठा धक्का बसला.

त्यानंतर उपस्थितांनी तातडीनं याबाबतची माहिती कापूरबावडी पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत महिलेचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर पोलिसांनी कादंबरी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाची पुढील चौकशी करायला सुरुवात केली आहे. जेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेली महिला इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून कोसळली तेव्हा तिच्या घरात तिचा पती आणि मोलकरीण हे दोघेच होते. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात दोघांची साक्ष नोंदवली आहे.

याशिवाय सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेज चेक केल्यानंतर कादंबरी यांचा तोल गेल्यानंच मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. या घटनेनं माजिवाड्यातील नागरिकांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तलरेजा कुटूंब हे राजस्थानातील जयपूरचं असून ते काही वर्षांपूर्वीच व्यवसायासाठी ठाण्यात स्थायिक झाले होते. त्यामुळं आता ही घटना घडल्यानंतर तलरेजा कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा