मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  " मुंबईत माझं घर नाही बरंय, नाहीतर.." देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

" मुंबईत माझं घर नाही बरंय, नाहीतर.." देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

Jun 11, 2022, 09:28 PM IST

    • देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड... मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाही. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल.
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले,केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड... मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाही. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल.

    • देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड... मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाही. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल.

मुंबई- शुक्रवारी राज्यसभेच्या ६ जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यानिवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धोबीपछाड दिला. या विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून कंगना राणावत, नारायण राणे, मोहित कंबोज, नवनीत राणा यांच्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

Narendra Dabholkar case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Mahuli Fort: माहुली गडावर ट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत कोसळला, जखमी तरुणाची २२ तासानंतर सुटका

देवेंद्र फडणवीस म्हणाले,केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड... मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाही. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल. नाहीतर मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरातील घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला नोटीस आलेली नाही. ही पद्धत योग्य नाही. केवळ सरकार चालवण्यासाठी,पदांसाठी सरकार चालवायचं. समाजातील एकाही घटकाचा विचार करायता नाही ही अवस्था आज पहायला मिळते ती अत्यंत खराब आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला आपला विजय हा खरे आपले लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण, शारीरिक स्थिती नसताना देखीलधोका पत्करून ते येथे आले. माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि काही झालं तरी मतदान करणारच या भावनेतून त्यांनी मतदान केलं. त्यांच्यामुळे आपली तिसरी जागा व्यवस्थित निवडून आली. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो.