मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीहून परतणारे चौघे भाऊ ठार

samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; काकांच्या अंत्यविधीहून परतणारे चौघे भाऊ ठार

May 24, 2023, 01:22 PM IST

  • Chhatrapati Sambhajinagar Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या अपघातात चौघा भावांचा मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar Acciden

Chhatrapati Sambhajinagar Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या अपघातात चौघा भावांचा मृत्यू झाला.

  • Chhatrapati Sambhajinagar Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या अपघातात चौघा भावांचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे (दि २४) च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघा भावांचा मृत्यू झाला. चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. दरम्यान हे चौघे भावंड दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक मुलगा सुदैवाने बचावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा गावाजवळ घडला. या अपघातात संजय राजणभाई गौड (वय ४३), कृष्णा राजणभाई गौड (वय ४४), श्रीनिवास रामू गौड (वय ३८), सुरेशभाई गौड (वय ४१) (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) अशी ठार झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गौड कुटुंबीयांचा सुरत येथे कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने हे चौघे दोन दिवसांपूर्वी अंत्यविधीसाठी तेलंगणा येथे गेले होते. दरम्यान, काल रात्री चौघे अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा सूरत येथे जाण्यासाठी निघाले होते. समृद्धी मार्गाने जात असतांना आज पहाटे ३ च्या सुमारास करमाड - शेकटा येथे त्यांच्या कार चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कार वरील नियंत्रण सुटले.

यामुळे वेगात असलेली त्यांची कार दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघा भावांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा