मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : संजय राऊत यांना धक्का! लाइफलाइन हॉस्पिटल घोटाळा प्रकरणात मित्र सुजीत पाटकरांवर गुन्हा

Sanjay Raut : संजय राऊत यांना धक्का! लाइफलाइन हॉस्पिटल घोटाळा प्रकरणात मित्र सुजीत पाटकरांवर गुन्हा

Aug 24, 2022, 10:47 AM IST

    • sanjay raunt friend sujit patkar :सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे चांगले मित्र असून ते बिझनेस पार्टनर  आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजीत पाटकर

sanjay raunt friend sujit patkar :सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे चांगले मित्र असून ते बिझनेस पार्टनर आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • sanjay raunt friend sujit patkar :सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे चांगले मित्र असून ते बिझनेस पार्टनर  आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यावर आता त्यांचे मित्रही ईडीच्या रडारवर आले आहेत. राऊतांचे बिझनेस पार्टनर आणि मित्र असलेले सुजीत पाटकर याच्यावर लाईफ लाइन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी १०० कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दिली आहे. 

 

सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे चांगले मित्र असून त्यांचे चांगले मित्र आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म व फर्मचे भागीदार हेमंत राम शरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू साळुंखे यांनी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वेगवेगळ्या जंबो कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काढलेल्या निविदा मिळविण्यासाठी यांनी फर्मच्या नावाने जून २०२२ रोजीचे बनावट व खोटे पार्टनरशीप तयार केली, असे सोमया यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. सुजीत पाटकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा