मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट.. शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची धास्ती

राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट.. शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची धास्ती

Jun 24, 2022, 10:19 PM IST

    • महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचं वृत्त आहे.
पोलीस ठाणी हाय अलर्टवर

महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीसठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचं वृत्त आहे.

    • महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचं वृत्त आहे.

मुंबई -विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणअनिश्चितीच्यागर्तेत सापडले आहे. दिवसेंदिवस राजकारण नवी कलाटणी घेत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा गट सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीसठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचं वृत्तANIनं दिलं आहे. राज्यातील शांततेला कोणताही धक्का लागू नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

ट्रेंडिंग न्यूज

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

Salman Khan firing Case: सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीची आत्महत्या

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर! सीएसएमटी स्थानकाजवळ रेल्वेचा डबा घसरल्याने प्रवाशांचे झाले होते हाल!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक भागात शिवसैनिकांनी शुक्रवारी आंदोलन केलं. मुंबईतील शिवसैनिक विशेष आक्रमक होते. शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला. यावेळी शिवसैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते. शिवसैनिक त्या रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला करत होते. यावेळी त्यांनी कुडाळकर यांच्या नावाचं बॅनर फाडलं. तसेच त्यांचा बॅनवरील फोटो देखील फाडला. शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचाही बॅनर फाडला. नाशिकमध्येही एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक झाली. वर्तमान आमदार पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सध्या वर्षा बंगला सोडलाय. पक्षासाठी लढण्याची हिंमत सोडली नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आला तर,तो जिंकू'असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांनी चुकीचं पाऊल उचललंय, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.