मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Timepass ३ box Office: दगडू आणि पालवीच्या प्रेमाचा जोरदार कल्ला, जाणून घ्या कमाई

Timepass ३ box Office: दगडू आणि पालवीच्या प्रेमाचा जोरदार कल्ला, जाणून घ्या कमाई

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 03, 2022, 09:59 AM IST

    • रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' (timepass 3 box office collection) ने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलं आहे. फक्त चार दिवसात चित्रपटाने कमालीची कमाई केली आहे. जाणून घ्या आतापर्यंतची कमाई.
टाइमपास ३

रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' (timepass 3 box office collection) ने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलं आहे. फक्त चार दिवसात चित्रपटाने कमालीची कमाई केली आहे. जाणून घ्या आतापर्यंतची कमाई.

    • रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' (timepass 3 box office collection) ने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलं आहे. फक्त चार दिवसात चित्रपटाने कमालीची कमाई केली आहे. जाणून घ्या आतापर्यंतची कमाई.

'टाइमपास' फ्रॅन्चायजीचा 'टाइमपास ३'(timepass 3) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब (prathmesh parab) दगडूच्या भूमिकेत आहे. सोबतच अभिनेत्री ऋता दुर्गुळे (hruta durgule) मुख्य भूमिकेत आहे. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाला आता चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात येण्यास भाग पाडलं आहे. सोबतच अभिनेते संजय नार्वेकर यांची भूमिका प्रेक्षकांना तुफान पसंत पडते आहे. आता पर्यंत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कोटींचा आकडा पार केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. प्रथमेशने लिहिलं, पब्लिकच्या प्रेमासह मराठी ब्लॉकबस्टर 'टाइमपास ३' ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात एण्ट्री. ४ दिवसांत कमावले ४. ३६ कोटी. २ नं. लवचा १ नं. लोचा पाहण्यासाठी 'टाइमपास ३' .' सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८० लाखांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने १ कोटी १० लाखांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे रविवारपर्यंत चित्रपटाने १ कोटी ९० लाखांची कमाई केली होती. आता गेल्या चार दिवसात चित्रपटाने ४ कोटी ३६ लाख रुपये कमावले आहेत. हा आकडा इतर चित्रपटांच्या मानाने खूप चांगला मानला जातोय.

दुसरीकडे 'टाइमपास ३' वर मराठी एकीकरण समितीकडून आक्षेप घेण्यात आला होता. चित्रपटात हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असं दाखवण्यात आल्याने त्यांच्या निषेधार्थ पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्यावर रवी जाधव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.