मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Latha Rajinikanth: रजनीकांत यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप; पत्नीने मौन सोडले

Latha Rajinikanth: रजनीकांत यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप; पत्नीने मौन सोडले

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 27, 2023, 09:36 AM IST

  • Latha Rajinikanth Cheating Case: सुपरस्टार रजनीकांतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. आता यावर रजनिकांतची पत्नी लता यांनी प्रतिक्रिया देत 'कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही' असे म्हटले आहे.

Latha Rajinikanth

Latha Rajinikanth Cheating Case: सुपरस्टार रजनीकांतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. आता यावर रजनिकांतची पत्नी लता यांनी प्रतिक्रिया देत 'कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही' असे म्हटले आहे.

  • Latha Rajinikanth Cheating Case: सुपरस्टार रजनीकांतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. आता यावर रजनिकांतची पत्नी लता यांनी प्रतिक्रिया देत 'कोणत्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही' असे म्हटले आहे.

सुपरस्टार रजनीकांत हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी रजनिकांतवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यावर आता रजनीकांतची पत्नी लता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही' असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम जाहिरातीसाठी तयार होणार; पण दुर्गाचं सत्य समोर येणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण

अर्जुन सायलीवर भडकला! फोनवरच भांडला; ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील! ‘कर्मवीरायण’चा ट्रेलर बघाच

फोटो डिलीट केले, घटस्फोटाची चर्चा! आता रणवीर सिंहनं लग्नाच्या अंगठीवर केलं मोठं वक्तव्य! काय म्हणाला?

लता यांनी नुकताच एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रजनिकांत यांच्यावर करण्यात आलेल्या फसवणुकीच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. 'एक लोकप्रिय व्यक्ती असल्याकारणामुळे हे प्रकरण आमच्यासाठी अपमान आणि शोषण करणार आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे ही किंमत मोजावी लागत आहे. ही काही मोठी गोष्ट नाही. कोणाचीही फसवणूक झालेली नाही.. पैशांशी माझे काही देणे-घेणे नाही' असे लता रजनिकांत यांनी म्हटले.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेल्या ‘मोये मोये’चा अर्थ काय? गायकानेच केला खुलासा

काय आहे प्रकरण?

२०१५ साली चेन्नईमधील एक जाहिरात कंपनीने सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप केला होता. मंगळवारी बंगळुरु येथील कोर्टात हे प्रकरण सादर करण्यात आले. या प्रकरणी सध्या कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. तसेच पुढील सुनावणी ६ जानेवारी होणार आहे. आता लता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून सगळे आरोप फेटाळले आहेत.

काय आहेत आरोप?

जाहिरात कंपनीने तक्रारीमध्ये म्हटले आहे की लता रजनीकांत यांनी दिलेल्या शब्दामुळे २०१४ साली 'कोचादाइया' चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शनचे काम सुरु करण्यात आले होते. या चित्रपटाची निर्मिती ग्लोबल एंटरटेनमेंट लिमिटेडद्वारा करण्यात आली होती आणि त्यासाठी १० कोटी रुपयांचा फंड जमा करण्यात आला होता. लता या कंपनीच्या निर्मात्या होत्या. तसेच या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. या कंपनीला १० कोटी रुपये आणि १-२ कोटी नफा परत करण्याची अपेक्षा लता यांच्याकडून होती. मात्र, त्यांनी अद्याप ही रक्कम परत केली नसल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे.