मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shamshera box office: रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चं दुकान बंद? कमाईत घसरण

Shamshera box office: रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चं दुकान बंद? कमाईत घसरण

Payal Shekhar Naik HT Marathi

Jul 25, 2022, 03:22 PM IST

    • Shamshera box office: रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये फक्त ३१ कोटींचा गल्ला जमवला आहे परंतु तज्ञांनी पुढच्या आठवड्याभरात कलेक्शनमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
शमशेरा

Shamshera box office: रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये फक्त ३१ कोटींचा गल्ला जमवला आहे परंतु तज्ञांनी पुढच्या आठवड्याभरात कलेक्शनमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

    • Shamshera box office: रणबीर कपूरच्या चित्रपटाने रिलीजच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये फक्त ३१ कोटींचा गल्ला जमवला आहे परंतु तज्ञांनी पुढच्या आठवड्याभरात कलेक्शनमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor shamshera box office collection) याचा 'शमशेरा' नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत कमालीची घसरण पाहायला मिळालीये. शुक्रवारी चित्रपटाची ओपनिंग अत्यंत कमी झाली होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने केलेल्या कमाईत शनिवारी वाढ दिसून आली मात्र रविवारी हा आकडा पुन्हा घसरला. आता पर्यंत चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली आहे. मात्र पुढील आठवड्यात हा आकडा अजून घसरण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

हा चित्रपट १५० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार झाला आहे. या चित्रपटातून रणबीरने तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यासोबतच हा चित्रपट मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात फार कमाई करणं अपेक्षित होतं. मात्र ते करण्यात चित्रपट अयशस्वी ठरला आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित चित्रपटात संजय दत्त आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९ व्या शतकातील एका घटनेवर आधारित आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया मधील एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने कमाईच्या बाबतीत मुख्य शहरांमध्ये शनिवारी सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. चित्रपटाने रविवारी ११ ते १२ कोटींचा गल्ला जमवला आहे, जे मागील दोन दिवसांच्या तुलनेत किरकोळ १० टक्क्यांनी जास्त आहे. मात्र पुढील आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पुढील आठवड्यात ५० कोटींच्या वर कमाई करण्यात अयशस्वी ठरेल असं काही सिने विश्लेषकांचं म्हणणं आहे. यानंतर रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.