मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची सडकून टीका

The Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची सडकून टीका

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 02, 2023, 11:24 AM IST

  • Naseerudin Shah on the Kerala Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द केरल स्टोरी या चित्रपटावर जोरदार टीका केली होती. आता मनोज तिवारीने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

Naseerudin Shah

Naseerudin Shah on the Kerala Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द केरल स्टोरी या चित्रपटावर जोरदार टीका केली होती. आता मनोज तिवारीने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

  • Naseerudin Shah on the Kerala Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द केरल स्टोरी या चित्रपटावर जोरदार टीका केली होती. आता मनोज तिवारीने त्यांना चांगलेच सुनावले आहे.

भारतातील बहुतेक कलाकार राजकीय किंवा सामाजिक विषयांवर भूमिका घेण्यास कचरत असताना ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह बेधडकपणे विविध विषयांवर मतं मांडत आहेत. अलीकडंच मुस्लिम समाजाच्या स्थितीबद्दल बोलणाऱ्या नसीर यांनी आता 'द केरल स्टोरी' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अभिनेता मनोज तिवारीने नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

तयार राहा... ‘बाहुबली’ पुन्हा येतोय! एसएस राजमौलींनी प्रेक्षकांना दिलं तगडं सरप्राईज! नव्या प्रोजेक्टची घोषणा

दिग्दर्शक सुदीप्तो सेनच्या द केरळ स्टोरी चित्रपटाला मनोज तिवारीने पाठिंबा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, 'नसीरुद्दीन शाह एक उत्कृष्ट कलाकार आहेत पण त्यांची नीयत चांगली नाही. मला हे बोलताना अतिशय वाईट वाटत आहे. जेव्हा नसीरुद्दीन शाह यांचे या देशात चित्रपट करायचे आणि ते प्रदर्शित व्हायचे.'

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

'भीड, अफवा, फराज हे तीनही चित्रपट फ्लॉप झाले. कुणीही हे चित्रपट बघायला गेलं नाही. तेच लोक 'द केरल स्टोरी' बघायला रांगा लावत आहेत. हा ट्रेंड अतिशय धोकादायक आहे. मी अजून 'द केरळ स्टोरी' पाहिलेला नाही आणि पाहण्याची इच्छाही नाही. कारण मी याबद्दल बरंच काही वाचलं आहे, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

'द केरल स्टोरी' सारख्या चित्रपटांबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी हिटरलच्या काळातील जर्मनीचा दाखला दिला. 'हिटलरच्या काळात चित्रपट निर्मात्यांना सर्वोच्च नेत्याचे गोडवे गाणारे, त्याच्या कार्याची स्तुती करणारे आणि ज्यू समाजाला अपमानित करणारे चित्रपट बनवण्यास सांगितलं जायचं. त्यामुळं अनेक महान निर्माते जर्मनी सोडून हॉलिवूडमध्ये गेले आणि तिथं चित्रपट बनवायला सुरुवात केली. इथंही असंच काहीसं घडताना दिसतंय. आपण नाझी जर्मनीच्या दिशेनं वाटचाल करतोय, असं नसीरुद्दीन म्हणाले.