मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कोण आहे परीचा बाबा अविनाश? जाणून घ्या त्याच्याविषयी

कोण आहे परीचा बाबा अविनाश? जाणून घ्या त्याच्याविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 22, 2022, 03:52 PM IST

    • माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नवे वळण आले आहे.
माझी तुझी रेशीमगाठ (HT)

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नवे वळण आले आहे.

    • माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नवे वळण आले आहे.

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी यश आणि नेहाचा दिमाखदार विवाह सोहळा पाहिला. त्या दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात होतच असताना अविनाश नावाचं वादळ त्यांच्या आयुष्यात आलं आहे. अविनाश हा नेहाचा पहिला पती असून त्याची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय. निखिल हा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना निखिल म्हणाला, 'परीचा बाबा कोण असेल? याबाबत सिरीअल सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती, तशीच ती मलाही होती आणि ही भूमिका करण्याची संधी मला मिळावी अशी मनोमन इच्छाही होती आणि म्हणतात ना, "अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिष मे लग जाती हैं" या उक्तीप्रमाणे अजय मयेकर, सुनील भोसले आणि झी मराठी यांच्या एकमताने ही भूमिका माझ्या वाट्याला आली म्हणून आनंद आणि जबाबदारी वाढली आहे.'

परीचा बाबा परीशी कसा वागतो? नेहाचा नवरा नेहाशी कसा वागतो? तो यशला त्रास देणार का? त्याचं मालिकेतील इतर पात्रांशी काय गणित आहे? असे अनेक आता प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहेत.

निखिलने आजवर काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘असेही एकदा व्हावे’, ‘बाईकर्स अड्डा’, '४ इडियट्स या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच छोटी मालकीण या मालिकेत तो दिसला होता.

विभाग