मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Project K: दीपिका पदुकोणच्या ‘प्रोजेक्ट के’ची रिलीज डेट जाहीर; पोस्टर शेअर करत म्हणाली...

Project K: दीपिका पदुकोणच्या ‘प्रोजेक्ट के’ची रिलीज डेट जाहीर; पोस्टर शेअर करत म्हणाली...

Feb 18, 2023, 04:03 PM IST

    • Project K Release date out: दीपिकाच नव्हे, तर प्रभास आणि अमिताभ बच्चन यांनी देखील ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.
Project K

Project K Release date out: दीपिकाच नव्हे, तर प्रभास आणि अमिताभ बच्चन यांनी देखील ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

    • Project K Release date out: दीपिकाच नव्हे, तर प्रभास आणि अमिताभ बच्चन यांनी देखील ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

Project K Release date out: ‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणखी एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. साऊथ स्टार प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के' या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटची अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता होती. अखेर आता 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची रिलीज डेट जाही करण्यात आली आहे. या चित्रपटाचं एक खास पोस्टर अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

...तेव्हा मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता; अभिनेता गश्मीर महाजनी याचा पहिल्यांदाच खुलासा

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

बाळ जन्माला येण्याआधीच होणार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा घटस्फोट? का आलं चर्चांना उधाण?

'प्रोजेक्ट के' हा सध्या मनोरंजनविश्वातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची रिलीज डेट आणि पोस्टर शेअर करताना दीपिकाने लिहिले की, संपूर्ण जग 'प्रोजेक्ट के' ची वाट पाहत आहे. दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रेक्षकांना रिलीज डेट सांगितली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक मोठा हात दिसत आहे, जो बोटांनी काहीतरी दाखवत आहे. तर, त्याच्यासमोर उभे असलेले तीन जण बंदुकीतून निशाणा साधत आहेत. तर, त्या मोठ्या हाताच्या मागे वाळू आणि काही तुटलेल्या इमारती दिसत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

दीपिकाच नव्हे, तर प्रभास आणि अमिताभ बच्चन यांनी देखील ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट २ भागात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कथेत सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. तर, दुसऱ्या भागात त्यामागची कथा सांगितली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. सध्या या चित्रपटाचा पहिला भाग पूर्णपणे तयार झाल्याचे बोलले जात आहे. तिन्ही कलाकार यावेळी एक हटके भूमिकेत दिसणार आहेत.