मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 4: चटर पटर बस झाली भाऊ; बिग बॉस मराठी ४चे टायटल साँग पाहिलेत का?

Bigg Boss Marathi 4: चटर पटर बस झाली भाऊ; बिग बॉस मराठी ४चे टायटल साँग पाहिलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 22, 2022, 02:21 PM IST

    • Mahesh Manjrekar : २ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
बिग बॉस मराठी (HT)

Mahesh Manjrekar : २ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    • Mahesh Manjrekar : २ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. २ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच बिग बॉस मराठीचे टायटल साँग प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

अभिराम जाहिरातीसाठी तयार होणार; पण दुर्गाचं सत्य समोर येणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठी सिझन चारचे टायटल साँग शेअर केले आहे. या गाण्यात महेश मांजरेकरांचा अनोखा अंदाज पाहायला मिळतो. तसेच हे गाणे शेअर करत त्यांनी, "मनोरंजनाचा खजिना खुलणार, १०० दिवसांचा खेळ रंगणार... 'BIGG BOSS मराठी' यंदा ALL IS WELL... हे सांगणारं टायटल साँग... खास तुमच्यासाठी! 'BIGG BOSS मराठी' Grand Premiere, 2" या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा : मी आणि अक्षया…; ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्यावर राणादाची प्रतिक्रिया

२ ऑक्टोबर २०२२ रोजी बिग बॉस मराठी सिझन ४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनसाठी स्पर्धकांना करोना निर्बंधांतून सुट देण्यात आली आहे. म्हणजेच शोमध्ये सहभागी होण्याच्या १५ दिवस आधी त्यांना स्वत:ला क्वारंटाइन करण्याची गरज नाही.

बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये राणादा आणि पाठकबाई म्हणजे हार्दीक जोशी, अक्षया देवधर ही जोडी सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच इतर काही कलाकारांची नावे चर्चेत आहेत. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विभाग