मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush: प्रभासने 'आदिपुरुष'साठी घेतले १०० कोटी? जाणून घ्या स्टारकास्टची फी

Adipurush: प्रभासने 'आदिपुरुष'साठी घेतले १०० कोटी? जाणून घ्या स्टारकास्टची फी

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 05, 2022, 10:07 AM IST

    • Adipurush Star Cast Fees: सध्या 'आदिपुरुष' हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील व्हीएएक्स पाहून चित्रपटावर टीका होत आहे.
आदिपुरुष (HT)

Adipurush Star Cast Fees: सध्या 'आदिपुरुष' हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील व्हीएएक्स पाहून चित्रपटावर टीका होत आहे.

    • Adipurush Star Cast Fees: सध्या 'आदिपुरुष' हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील व्हीएएक्स पाहून चित्रपटावर टीका होत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी चित्रपटावर टीका केली आहे. पण तुम्हाला माहितीये का या चित्रपटासाठी प्रभास आणि सैफ अली खानने किती मानधन घेतले. चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार, 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये प्रभास प्रभू राम यांच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉनने जानकीची, तर सैफ अली खानने लंकेशची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय देवदत्त नागे या मराठमोळ्या अभिनेत्याने चित्रपटामध्ये महत्त्वाचे पात्र साकारले आहे. प्रभासने चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे. काही दिवसांनंतर प्रभासने वाढवून १५० कोटी केल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: बहुचर्चित 'आदिपुरुष'चा टीझर प्रदर्शित, क्रिती सेनॉनच्या लूकवर चाहते फिदा

सैफ अली खानने लंकेशच्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन घेतले आहे. प्रभासच्या तुलनेत सैफने अगदीच कमी मानधन घेतले आहे. तर क्रिती सेनॉनने सीतेच्या भूमिकेसाठी ३ कोटी रुपये फी घेतली आहे. लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता सनी सिंहने १.५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

'आदिपुरुष' चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच टीझरमध्ये काही मराठी कलाकार देखील असल्याचे दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी केली आहे.

विभाग