मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan: आमिर खानने सांगितला 'लगान' मधला झोल! भुवनच्या लूकमध्ये नेमकी काय होती गडबड?

Aamir Khan: आमिर खानने सांगितला 'लगान' मधला झोल! भुवनच्या लूकमध्ये नेमकी काय होती गडबड?

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 11, 2022, 05:35 PM IST

    • aamir khan on lagaan: आमिर खानचा लगान हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. आता आमिरने या चित्रपटातील भुवनच्या लूकमधील एक मोठी चूक निदर्शनास आणून दिली आहे.
आमिर खान

aamir khan on lagaan: आमिर खानचा लगान हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. आता आमिरने या चित्रपटातील भुवनच्या लूकमधील एक मोठी चूक निदर्शनास आणून दिली आहे.

    • aamir khan on lagaan: आमिर खानचा लगान हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. आता आमिरने या चित्रपटातील भुवनच्या लूकमधील एक मोठी चूक निदर्शनास आणून दिली आहे.

aamir khan shows fault in lagaan: आमिर खानला उगीच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जात नाही. चित्रपटाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत तो खोलवर जातो. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. त्यामुळेच लोक त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. आता त्याने 'लगान'शी संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे, ज्याकडे यापूर्वी फारसं कुणाचही लक्ष गेलं नाही. आमिरच्या मते, भुवनच्या लूकमध्ये काहीतरी गडबड होती. हा चित्रपट पुन्हा बनवला तर तो नक्कीच ही चूक पुन्हा करणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, त्याची एक मुलाखत व्हायरल झाली आहे ज्यामध्ये आमिरने अनेक मजेशीर खुलासे केले आहेत. यात त्याला विचारलं जातं की तो 'लाल सिंग चड्डा' मधील पाणीपुरी किंवा ३ इडियट्स' मधील थाळी काय पसंत करेल. यावर आमिर आधी म्हणतो, '३ इडियट्स' ची प्लेट भरली होती, मग तो म्हणतो, नाही, मी पाणीपुरी खाईन. यानंतर त्याला विचारलं जातं की 'लाल सिंह चड्ढा'मधील पाणीपुरीच्या सीनची कथा काय आहे. यावर आमिर म्हणतो, तोच संदर्भ त्याची आई देत राहते, त्याला म्हणते की आयुष्य हे पाणीपुरीसारखं आहे, पोट भरलं तरी मन भरत नाही.

यानंतर, त्याला परफेक्शनिस्ट असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतो, तो परफेक्शनवर विश्वास ठेवतो का? यावर आमिर म्हणतो की मी परिपूर्णतेवर विश्वास ठेवत नाही कारण परिपूर्ण नसण्यात सौंदर्य आहे. मी परफेक्शनिस्ट आहे असं मला वाटत नाही. आमिरला विचारण्यात आलं की, जर त्याने आज लगान बनवला तर काय वेगळे असेल? यावर तो म्हणतो, यावेळी मी आशुतोषला पुन्हा सांगेन की भुवनचे पात्र दाढी करू शकत नाही. मी त्याला सांगेन की इथे पाणी नाही, लोक नाराज आहेत आणि हा माणूस रोज दाढी करतो. त्याला कुठूनतरी गुप्त पाणीपुरवठा होतो. पण आशुतोषला मला एका खास नजरेने बघायचं होतं. त्याला मला क्लीनशेव बघायचं होतं. मला हे समजलं नाही. त्यामुळे मी पुन्हा चित्रपट बनवला तर यावेळी दाढी वाढू द्यावी, अशी दिग्दर्शकाला विनंती करेन.

विभाग