मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ambassador Car : अँम्बेसेडर गाडी आठवते का? या कारणामुळे कंपनीला बंद करावे लागले उत्पादन

Ambassador Car : अँम्बेसेडर गाडी आठवते का? या कारणामुळे कंपनीला बंद करावे लागले उत्पादन

Feb 19, 2023, 03:06 PM IST

    • Ambassador Car : हिंदुस्थान मोटर्स लिमिटेड नावाच्या कंपनीने अॅम्बेसेडर कारची निर्मिती केली होती. ती भारतीय कंपनी होती. तिला हिंदुस्थान अॅम्बेसेडर म्हणूनही ओळखले जात असे. कारच्या उत्कृष्ट लुक आणि परफॉर्मन्समुळे ती चांगलीच पसंतीस उतरली होती.
Ambassador Car HT

Ambassador Car : हिंदुस्थान मोटर्स लिमिटेड नावाच्या कंपनीने अॅम्बेसेडर कारची निर्मिती केली होती. ती भारतीय कंपनी होती. तिला हिंदुस्थान अॅम्बेसेडर म्हणूनही ओळखले जात असे. कारच्या उत्कृष्ट लुक आणि परफॉर्मन्समुळे ती चांगलीच पसंतीस उतरली होती.

    • Ambassador Car : हिंदुस्थान मोटर्स लिमिटेड नावाच्या कंपनीने अॅम्बेसेडर कारची निर्मिती केली होती. ती भारतीय कंपनी होती. तिला हिंदुस्थान अॅम्बेसेडर म्हणूनही ओळखले जात असे. कारच्या उत्कृष्ट लुक आणि परफॉर्मन्समुळे ती चांगलीच पसंतीस उतरली होती.

Ambassador Car : तुम्ही अ‍ॅम्बेसेडर कार रस्त्यावर किंवा एखाद्याच्या गॅरेजमध्ये अनेकदा पाहिली असेल. आजकाल क्वचितच दिसणारी ही गाडी एकेकाळच्या भारतीय रस्त्यावरची सम्राज्ञी होती. नेतेमंडळी, अधिकारी किंवा व्यापारी सर्व लोकांची पहिली पसंती तिलाच असायची. जुन्या काळी अॅम्बेसेडर कार खरेदी करणे हा सन्मानाचा विषय असायचा, पण एक वेळ अशी आली की, क्षणार्धात ही कार काळाच्या पडद्याआड गेली.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

वास्तविक, अॅम्बेसेडर कार हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड नावाच्या कंपनीने बनवली होती. ती भारतीय कंपनी होती. तिला हिंदुस्थान अॅम्बेसेडक म्हणूनही ओळखले जात असे. कारच्या उत्कृष्ट लुक आणि परफॉर्मन्समुळे ती चांगलीच पसंतीस उतरली होती. तेव्हाही त्याची किंमत एवढी कमी होती की, मध्यमवर्गीय कुटुंबालाही ती परवडणारी होती.

मारुतीने वर्चस्व संपवले

हिंदुस्थान मोटर्स अॅम्बेसेडर पहिल्यांदा १९५८ मध्ये लाँच करण्यात आली. त्या काळानुसार गाडीची रचना जबरदस्त होती. लॉन्च झाल्यानंतर या कारने ८० च्या दशकापर्यंत संपूर्ण भारतावर राज्य केले. दरम्यान, भारताच्या कानाकोपऱ्यात ती प्रत्येकाची पसंती बनली. त्याकाळात आपल्याजवळही अॅम्बेसेडर असावी, असे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या घरात होती. पण आता या कारने पाहिलेली उंची संपण्याची वेळ आली होती. १९८३ मध्ये मारुती सुझुकीने आपली पहिली कार मारुती ८०० लाँच केली. त्यावेळी त्याची किंमत सुमारे ५३ हजार रुपये होती. मारुती ८०० लाँच झाल्यापासून अॅम्ंबेसेडरचे वर्चस्व कमी होऊ लागले.

परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारात शिरकाव

९० च्या दशकापर्यंत कारच्या विक्रीत कमालीची घट झाली होती. येणारा काळ आणखी वाईट असणार होता, कारण यावेळी अनेक परदेशी कंपन्या भारतात दाखल होत होत्या. मात्र, कंपनीने काही युरोपीय देशांमध्ये वेगळ्या नावाने अॅम्बेसेडर लाँच केले. त्यात आवश्यक ते बदलही करण्यात आले, पण त्यात यश आले नाही. येथे, २०१० पर्यंत कारची विक्री जवळजवळ संपली होती. कंपनी तोट्यात जात होती. अखेर २०१४ मध्ये त्याचे उत्पादन थांबवण्यात आले आणि एकेकाळच्या सर्वांच्या आवडत्या कारचा प्रवास संपुष्टात आला.

विभाग