मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex : २०२४ ला पुन्हा मोदी सरकार आल्यास सेन्सेक्स १ लाख पार जाणार

Sensex : २०२४ ला पुन्हा मोदी सरकार आल्यास सेन्सेक्स १ लाख पार जाणार

May 26, 2023, 03:55 PM IST

  • Chris Wood on Sensex : भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स येत्या पाच वर्षांत १ लाखांचा आकडा पार करेल, असा दावा शेअर बाजार तज्ज्ञ ख्रिस वुड यांनी केला आहे.

Chris Wood on Sensex

Chris Wood on Sensex : भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स येत्या पाच वर्षांत १ लाखांचा आकडा पार करेल, असा दावा शेअर बाजार तज्ज्ञ ख्रिस वुड यांनी केला आहे.

  • Chris Wood on Sensex : भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स येत्या पाच वर्षांत १ लाखांचा आकडा पार करेल, असा दावा शेअर बाजार तज्ज्ञ ख्रिस वुड यांनी केला आहे.

Chris Wood on Sensex : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांचे शेअर बाजार मंदीच्या झळा सोसत असताना भारतीय शेअर बाजार सकारात्मकतेनं भरलेला आहे. झेपावण्यासाठी उत्सुक आहे. येत्या काही वर्षांत सेन्सेक्स १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो, असा दावा भारतीय शेअर बाजार तज्ज्ञ ख्रिस वुड यांनी केला आहे. अर्थात, मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार का, हा त्यातील कळीचा मुद्दा ठरेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

ख्रिस वुड हे ब्रोकरेज फर्म 'जेफरीज'मधील इक्विटी स्ट्रॅटेजीचे ग्लोबल हेड आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, बीएसई सेन्सेक्स १ लाखाचा टप्पा ओलांडू शकतो, परंतु हा टप्पा गाठण्यासाठी पाच वर्षे लागू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

multibagger stock : अवघ्या २० पैशांचा शेअर पोहोचला ३८६ रुपयांवर; गुंतवणूकदारांना मिळालं संयमाचं फळ

दीर्घकाळाचा विचार करता भारतीय शेअर बाजारात तेजी राहील. मात्र, शॉर्ट टर्ममध्ये काही प्रश्न अडचणीचे ठरू शकतात. पुढच्या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मोदी सरकार देशात पुन्हा सत्तेवर येणार का, हा पहिला कळीचा प्रश्न ठरेल, असं वुड यांना वाटतं. मागील काही काळापासून शेअर बाजार सावध वाटचाल करतोय. त्यामुळं किरकोळ गुंतवणूकदारही फार हालचाल करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांची भूमिका हा शेअर बाजारासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

सक्रिय डीमॅट खात्यांमध्ये घसरण

जून २०२२ मध्ये सक्रिय डीमॅट अकाऊंट्सची संख्या ३.८ कोटी होती. एप्रिल २०२३ मध्ये ती ३.१ कोटींपर्यंत घसरली आहे. फेब्रुवारीपर्यंतच्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी ४.५ अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत, तर मार्चपासून ७ अब्ज डॉलर किंमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. याचाच अर्थ, देशांतर्गत बाजारात पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे.

LIC Dividend : नफा होताच एलआयसीनं केली लाभांशाची घोषणा

…म्हणून वुड यांचा दावा महत्त्वाचा

गेल्या ५ वर्षांत सेन्सेक्स ७६.८३ टक्क्यांनी वधारून ६२,२९२ पर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत २७०७३ अंकांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील ३ वर्षांबद्दल बोलायचं झाल्यास ३ एप्रिल २०२० रोजी सेन्सेक्स २७,५९० वर होता. आज तो कितीतरी वर आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळंच वुड यांचा दावा महत्त्वाचा ठरतो.