multibagger stock : अवघ्या २० पैशांचा शेअर पोहोचला ३८६ रुपयांवर; गुंतवणूकदारांना मिळालं संयमाचं फळ
Praj Industries ltd share price : प्राज इंडस्ट्रिजचा अवघ्या २० पैशांचा शेअर आता ३८६ रुपयांवर गेला असून अजूनही त्यात वाढ होतच आहे.
Praj Industries ltd share price : संयम हा शेअर बाजारात सर्वात मोठा गुण ठरताना दिसतो. या संयमाचं फळ आजवर हजारो गुंतवणूकदारांनी चाखलं आहे. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडच्या गुंतवणूकदारांनाही हे फळ मिळालं आहे. सुमारे २२ वर्षांपूर्वी २० पैसे किंमत असलेला या कंपनीचा शेअर आता ३८६ रुपयांवर पोहोचला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
प्राज इंडस्ट्रिजच्या शेअरनं आतापर्यंत ३६६७ टक्क्यांनी झेप घेतली आहे. १४ जुलै १९९५ रोजी या शेअरची किंमत १०.१० रुपये होती. तर १७ सप्टेंबर २००२ रोजी हा शेअर २० पैशांपर्यंत खाली घसरला होता. त्यावेळी कंपनीवर विश्वास दाखवून गुंतवणूक कायम ठेवणारे गुंतवणूकदार आता मालामाल झाले आहेत.
LIC Dividend : एलआयसीला ५ पट नफा, विमा कंपनीने केली लाभांशाची घोषणा, असा होणार फायदा
कंपनीचे मार्च अखेरच्या तिमाहीचे रिझर्ल्ट चांगले आले आहेत. त्यामुळं प्राज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. आज हा शेअर मागील ३५६.८० रुपयांच्या तुलनेत ३७६.१० रुपयांवर उघडला आणि ८ टक्क्यांनी वाढून ३८६.५० रुपयांवर गेला. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या शेअरनं ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला होता. त्यावेळी शेअरची किंमत ४६१.५० वर गेली होती.
कंपनीनं २५ मे रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीचा करानंतरचा एकत्रित नफा ८८.१२ कोटी रुपये इतका आहे. दरवर्षी यात वाढ होत असल्याचं दिसत आहे. याच तिमाहीतील ऑपरेटिंग प्रॉफिट १००३.९८ कोटी होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ते २१ टक्क्यांनी अधिक आहे.
इंडियन ऑइलशी सहकार्य
विविध प्रकारच्या जैवइंधनाच्या उत्पादनासाठी प्राज इंडस्ट्रिजच्या संचालक मंडळानं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) सोबत संयुक्त सहकार्य करार करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. शाश्वत विमान इंधनाचे (SAF) उत्पादन हा दोन्ही कंपन्यांचा संयुक्त प्रकल्प असण्याची शक्यता आहे. सर्व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशीपुरा यांनी सांगितलं.