मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sahara India : सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांना मिळणार पैसे, सेबीचा आदेश

Sahara India : सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांना मिळणार पैसे, सेबीचा आदेश

Dec 08, 2022, 01:48 PM IST

    • Sahara India : सहारा इंडियामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहारा समुहाला १५ दिवसांच्या आत ६.४ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
subrat roy sahara India HT

Sahara India : सहारा इंडियामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहारा समुहाला १५ दिवसांच्या आत ६.४ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

    • Sahara India : सहारा इंडियामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहारा समुहाला १५ दिवसांच्या आत ६.४ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

Sahara India : सहारा इंडियामध्ये पैसा अडकलेल्या गुंतवणूकदारांना आता त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. सेबीने नियामकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत राॅय आणि इतर जणांना १५ दिवसांच्या आत ६.४२ कोटी रुपये भऱण्याचे आदेश दिले आहेत. पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. सेबीने यासंदर्भात बजावलेल्या नोटीशीमध्ये ही रक्कम १५ दिवसांच्या आत भरण्याचे निर्देश दिले आहेत. यात व्याज आणि रिकव्हरी शुल्काचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

सहारातून पैसे क्लेम करण्यासाठी प्रक्रिया

तुमचे यात पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्यासाठी सेबी किंवा कन्झ्युमर हेल्पलाईनकडून मदत घ्यावी लागेल. यासाठी तुम्ही घरी बसूनही अर्ज करु शकतात आणि क्लेम करु शकतात. सेबीने सहारा इंडिया समुहातील दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना १३८ कोटी रुपये रिफंड केले आहेत. री-पेमेंटसाठी विशेष उघडण्यात आलेल्या बॅक खात्यामधील जमा रक्कम २४ हजार कोटींपेक्षा अधिक झाली आहे.

गुंतवणूकदारांना सेबीच्या हेल्पलाईनवर सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काॅल करावा लागेल. सहाराकडून रिफंड घेण्यासाठी आपली तक्रार दाखल करावी लागेल. त्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे -

त्यासाठी सगळ्यात आधी सरकारच्या कन्झ्युमर हेल्पलाईन संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे एक खाते बनवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या युजर आयडीवरुन लाॅगइन करावे लागेल. लाॅगिन झाल्यानंतर तक्रार दाखल करावी लागेल. सर्व संबंधित दस्तावेज अपलोड केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तक्रार दाखल होईल. तक्रार दाखल झाल्याचा पुरावा तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर मिळेल. यानंतर लगेचच तुमच्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.

सेबीने जूनमध्ये सहारा इंडिया रिअल इस्टेट काॅर्पोरेशनच्या सुब्रत राॅय, अशोक राॅय चौधरी, रवि शंकर दुबे आणि वंदना भार्गव यांच्यावर तब्बल ६ कोटींचा भूर्दंड होता.

 

विभाग