मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PPF : पीपीएफ गुंतवणूकदारांना झटका, सलग दुसऱ्या तिमाहीत व्याजदर वाढ नाहीच !

PPF : पीपीएफ गुंतवणूकदारांना झटका, सलग दुसऱ्या तिमाहीत व्याजदर वाढ नाहीच !

Apr 01, 2023, 10:34 AM IST

    • PPF : पीपीएफ योजनेतील गुंतवणूकदारांकडे सरकारने सलग दुसऱ्यांदा पाठ फिरवली असून व्याजदरात वाढ केलेली नाही.
PPF HT

PPF : पीपीएफ योजनेतील गुंतवणूकदारांकडे सरकारने सलग दुसऱ्यांदा पाठ फिरवली असून व्याजदरात वाढ केलेली नाही.

    • PPF : पीपीएफ योजनेतील गुंतवणूकदारांकडे सरकारने सलग दुसऱ्यांदा पाठ फिरवली असून व्याजदरात वाढ केलेली नाही.

PPF : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील गुंतवणूकदारांसाठी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. एप्रिल-जून २०२३ या तिमाहीसाठी सरकारने ७० बेसिस पॉइंट्सची वाढ केली ​​आहे. सर्व प्रकारच्या पोस्ट ऑफिस स्कीम, डिपॉझिट स्कीमवर व्याजदरात वाढ करण्यात आली आहे, मात्र सरकारने सलग दुसऱ्यांदा पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड इंटरेस्ट रेट) योजनेच्या गुंतवणूकदारांकडे पाठ फिरवली आहे. जूनच्या तिमाहीतही पीपीएफवरील व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

१२ बचत योजनांमध्ये १० टक्के व्याजदर

अर्थ मंत्रालय लहान बचत योजना आणि पोस्ट ऑफिस योजनांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करून व्याजदर वाढवते. ३१ मार्च २०२३ रोजी व्याजदरात वाढ केल्याची घोषणा करून अर्थ मंत्रालयाने लहान बचत योजनांच्या १२ बचत योजनांपैकी १० बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे.

पीपीएफच्या दरात वाढ नाही

गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक आकर्षक असलेल्या पीपीएफ बचत योजनेवरील व्याजदरात अर्थ मंत्रालयाने वाढ केलेली नाही. जून तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी जानेवारीच्या तिमाहीतही वित्त मंत्रालयाने पीपीएफ योजनेवरील व्याजदरात वाढ केली नव्हती. सध्या पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के आहे.

बचत ठेव योजनेवर सर्वात कमी व्याज दर

१२ बचत योजनांमध्ये पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) व्यतिरिक्त अर्थ मंत्रालयाने बचत ठेव योजनेच्या व्याजदरातही वाढ केलेली नाही. सध्या सरकार बचत ठेव योजनेवर ४ टक्के व्याजदर देत आहे. लघु बचत योजनेच्या सर्व १२ योजनांमध्ये सर्वात कमी व्याजदर फक्त ४% बचत ठेवीवर आहे.

विभाग