मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PPF Account Update : तुमचं पीपीएफ अकाऊंट होऊ शकतं बंद; त्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

PPF Account Update : तुमचं पीपीएफ अकाऊंट होऊ शकतं बंद; त्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 22, 2022 12:02 PM IST

PPF Account Update : कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पीपीएफ अकाऊंटमध्ये आर्थिक वर्षात व्यवहार होणं गरजेचं असतं. तसं झालं नाही तर खातं बंद होण्याची शक्यता असते.

PPF Account
PPF Account (HT)

PPF Account Update : पीपीएफ ही योजना केंद्र सरकारनं लोकांच्या वृद्धापकाळातील सुरक्षेसाठी आणि असंघटीत क्षेत्रातील लोकांसाठी सुरू केली होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कमीत कमी जोखिमेवर मोठा परतावा मिळू शकतो. पीपीएफ या योजनेमार्फत करदात्यानं एका वर्षात सातत्यानं ५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास त्याला एकूण करातून दीड लाखांपर्यंतची सूट मिळू शकते. याशिवाय पीपीएफमध्ये दीड लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. दीड लाखांच्या रकमेसाठी ७.१ इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. परंतु अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचं पीपीएफ खातं बंद होण्याची भीती असते. परंतु जर तुमचं खातं बंद झालं असेल तर त्यासाठी केवळ एक अर्ज करून तुम्ही तुमचं खातं पुन्हा चालू करू शकता.

अकाऊंट कधी बंद होतं?

एखाद्या कर्मचाऱ्यांना मार्च ते एप्रिल या आर्थिक वर्षाच्या कालावधीत पीपीएफ अकाऊंटमधून व्यवहार केलेला नसेल तर त्याचं अकाऊंट बंद होण्याची शक्यता असते. एका रिपोर्टनुसार, अशा पद्धतीनं देशातील लाखो खाती बंद झाली असून त्यात ३० हजार कोटी रुपये पडून आहेत. याशिवाय अशा वेळेस त्याच्या खात्यावरील व्यवहारांवर मर्यादा येत असते. त्याचबरोबर या काळाता पीपीएफ खात्यावर व्यवहार न झाल्यास कर्मचाऱ्याला पीपीएफ अकाऊंटवरून कर्ज घेता येत नाही.

अकाऊंट बंद होऊ नये, यासाठी काय कराल?

पीपीएफ खातं बंद होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी आर्थिक वर्षात किमान पाच ते सहा वेळा व्यवहार करायला हवा. काही ठराविक महिन्यांत खात्यावरून रक्कम काढली तर तुम्हाला पीपीएफ खात्यावरून कर्ज घेण्याचाही पर्याय उपलब्ध होत असतो. त्यामुळं तुमचं पीपीएफ खातं बंद झालं असेल तर तुम्ही EPFO च्या वेबसाईटवरून खातं चालू करण्यासाठी अर्ज करू शकता किंवा जवळच्या ईपीएफओ कार्यालयात संपर्क साधू शकता.

IPL_Entry_Point