मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : आज अनेक शहरांत कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर, पाहा तुमच्या शहरातील किंमती

Petrol Diesel price today : आज अनेक शहरांत कमी झाले पेट्रोल डिझेलचे दर, पाहा तुमच्या शहरातील किंमती

May 28, 2023, 08:22 AM IST

    • Petrol Diesel price today 28 May 2023 : आज देशात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात घट झाली आहे. तरीही महानगरांमध्ये तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 28 May 2023 : आज देशात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात घट झाली आहे. तरीही महानगरांमध्ये तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

    • Petrol Diesel price today 28 May 2023 : आज देशात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात घट झाली आहे. तरीही महानगरांमध्ये तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel price today 28 May 2023 पेट्रोल आणि डिझेलचे दर आज म्हणजेच २८ मे साठी जाहीर करण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. तेल कंपन्यांनी सकाळी सहा वाजता नवे दर अपडेट केले आहेत. त्याचबरोबर देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

दिल्लीजवळील नोएडामध्ये पेट्रोलच्या दरात २५ पैशांनी घट झाली असून ते ९६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल २४ पैशांनी कमी होऊन ८९.८४ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल ३२ पैशांनी आणि डिझेल ३० पैशांनी कमी झाले आहे, ज्यांचे दर अनुक्रमे ९६.२६ रुपये आणि ८९.४५ रुपये प्रति लीटर झाले आहेत. लखनौमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर आहे.

राजस्थानच्या जयपूरमध्ये पेट्रोल ४८ पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. सध्या दर १०८.०८ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ४४ पैशांनी स्वस्त होऊन ९३.३६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. एनसीआर प्रदेश गुरुग्राममध्ये पेट्रोल ९६.९७ रुपये आणि डिझेल ८९.८४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, येथे इंधनात ४ पैशांची घट झाली आहे. पाटण्यात पेट्रोल १८ पैशांनी स्वस्त होऊन १०७.२४ रुपये आणि डिझेल १७ पैशांनी स्वस्त दराने ९४.०४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई-पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग