मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : चेन्नईत पेट्रोल डिझेल स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजच्या किंमती

Petrol Diesel price today : चेन्नईत पेट्रोल डिझेल स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजच्या किंमती

May 08, 2023, 08:36 AM IST

    • Petrol Diesel price today 08 May 2023 : सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. मात्र, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. राज्यनिहाय पातळीवर केवळ २-३ राज्यांमध्ये किंमती बदलल्या आहेत.
petrol diesel HT

Petrol Diesel price today 08 May 2023 : सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. मात्र, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. राज्यनिहाय पातळीवर केवळ २-३ राज्यांमध्ये किंमती बदलल्या आहेत.

    • Petrol Diesel price today 08 May 2023 : सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. मात्र, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. राज्यनिहाय पातळीवर केवळ २-३ राज्यांमध्ये किंमती बदलल्या आहेत.

Petrol Diesel price today 08 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ४.०६ टक्क्यांनी वाढून ७१.३४ डाॅलर्स प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ३.८६ टक्क्यांच्या वाढीसह ७५.३० डाॅलर्सवर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

आज देशात राज्य पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये फार कमी ठिकाणी बदल दिसत आहे. पंजाबमध्ये पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महागलं आहे. तामिळनाडूमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये पेट्रोल १३ पैसे आणि डिझेल १२ पैसे स्वस्त विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १० पैशांनी आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त झाले आहे.

देशातील विविध शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग