मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Bullish : या आयपीओला येणार ‘अच्छे दिन’, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला

IPO Bullish : या आयपीओला येणार ‘अच्छे दिन’, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला

Dec 05, 2022, 04:31 PM IST

    • या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान या फिन टेक कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
IPO HT

या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान या फिन टेक कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

    • या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान या फिन टेक कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Paytm IPO : पेटीएम शेअर्सच्या किंमतीत गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान या फिन टेक कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

पेटीएम शेअर्सच्या किंमतीत गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान या फिन टेक कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. नुकतेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तज्ज्ञांसोबत बैठक झाली. या बैठकीदरम्यान कंपनीचे अधिकारी कंपनीच्या वाढीबाबत चांगलेच सकात्मक होते. अनेक ब्रोकरेज हाऊसेसनी पेटीएमच्या शेअर्सचे मूल्य १२८५ रुपयांच्या पातळीपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. अनेक तज्ज्ञांनी कंपनीच्या शेअर्ससाठी बाय नाऊचा कौल दिला आहे.

पेटीएमच्या शेअर्स मूल्यामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये ८.४ टक्के वाढ झाली.तर बीएसईमध्ये ७.०६ टक्के उसळीसह ५३६.९० रुपयांच्या पातळीवर बंद झाले.

या ब्रोकरेज फर्म्सनी दिला बाय नाऊचा इशारा

माॅर्गन स्टेनली, सीएलएसए आणि जेएम फायनान्शिअलने पेटीएमच्या शेअर्सचे टार्गेट प्राईज ६०० ते ७०० रुपये निश्चित केले आहे. आयसीआयसीआय सिक्यूरिटीज आणि गोल्डमॅन सॅक यांनी पेटीएमचा भाव ११०० ते १३०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन्ही ब्रोकरेज फर्म्सनी त्यांचे टार्गेट प्राईज पुढील १२ महिन्यांसाठी निश्चित केली आहे. सर्व ब्रोकरेज फर्म्सनी पेटीएमच्या आयपीओला बाय नाऊचा कौल दिला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग