मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm RBI : रिझर्व्ह बॅकेचा दंडुका ! पेटीएमची ‘ही’ सेवा होणार बंद

Paytm RBI : रिझर्व्ह बॅकेचा दंडुका ! पेटीएमची ‘ही’ सेवा होणार बंद

Nov 27, 2022, 11:22 AM IST

    • Paytm RBI :आरबीआयने पेटीएम पेमेंट सर्व्हिसला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी अर्ज पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे.
paytm HT

Paytm RBI :आरबीआयने पेटीएम पेमेंट सर्व्हिसला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी अर्ज पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे.

    • Paytm RBI :आरबीआयने पेटीएम पेमेंट सर्व्हिसला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी अर्ज पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे.

Paytm RBI : आरबीआयने पेटीएम पेमेंट सर्व्हिसला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी परवाना पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बॅकेने पेटीएम पेमेंट सेवेद्वारे ऑनलाइन व्यापाऱ्यांच्या ऑनबोर्डिंगवर बंदी घातली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी अर्ज पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे. बँकिंग नियामकाने पेटीएम पेमेंट सेवेद्वारे ऑनलाइन व्यापाऱ्यांच्या ऑनबोर्डिंगवर बंदी घातली आहे. वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडने डिसेंबर २०२० मध्ये आपला 'पेमेंट एग्रीगेटर' सेवा व्यवसाय पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु नियामकाने हा अर्ज फेटाळला आहे.

१२० दिवसांच्या आत पुन्हा अर्ज करावा लागेल

पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, 'पेटीएम एग्रीगेटर' संदर्भात कंपनी १२० दिवसांच्या आत पुन्हा अर्ज करू शकते. आरपीआयच्या या निर्णयाचा त्यांच्या व्यवसायावर आणि उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण आरबीआयच्या पत्रात फक्त नवीन ऑनलाइन व्यापाऱ्यांपुरत्या व्यवसायाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आम्ही नवीन ऑफलाइन व्यापारी जोडणे आणि त्यांना सेवा ऑफर करणे सुरू ठेवू शकतो.

कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये पुन्हा आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. कंपनीने त्यावेळी सादर केलेल्या पत्रात ऑनलाइन व्यावसायिकांसाठी 'पेमेंट एग्रीगेटर' सेवा उपलब्ध करून देण्यास मंजुरी मागितली होती.पीपीएसएलला एफडीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी त्यामध्ये केलेल्या मागील 'डाउनवर्ड' गुंतवणुकीसाठी कंपनीकडून आवश्यक मंजूरी घ्यावी लागेल. तसेच, नवीन ऑनलाइन व्यावसायिकांचा समावेश करावा लागणार नाही, असे सुचित केले होते.

 

विभाग

पुढील बातम्या