मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Fastag insurance : हायवेवरील वाहनांना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ विमा कवच; केंद्राची मस्त योजना

Fastag insurance : हायवेवरील वाहनांना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ विमा कवच; केंद्राची मस्त योजना

Feb 28, 2023, 07:47 PM IST

  • Auto Insurance through Fastag : महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना फास्टॅग खात्याचा वापर करून ऑन-द-स्पॉट विमा संरक्षण देण्याची योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

fastag HT

Auto Insurance through Fastag : महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना फास्टॅग खात्याचा वापर करून ऑन-द-स्पॉट विमा संरक्षण देण्याची योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

  • Auto Insurance through Fastag : महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना फास्टॅग खात्याचा वापर करून ऑन-द-स्पॉट विमा संरक्षण देण्याची योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

Fastag insurance महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना फास्टॅग खात्याचा वापर करून ऑन-द-स्पॉट विमा संरक्षण देण्याची योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Export duty on onion : कांद्याच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० टक्के निर्यात शुल्क लागू

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

अशी आहे योजना

सध्या, भारतातील एकूण वाहनांपैकी ४० ते ५० टक्के वाहने विमारहित आहेत. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासारखा आहे. तसेच, थर्ड पाटी इन्शुरन्स नसलेली वाहने वाहतूक पोलिस किंवा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अडविल्यास हे अधिकारीदेखील संबंधित वाहनचालकांना इन्शुरन्स कव्हरेज देऊ शकतील, अशीही योजना केंद्र सरकार आणण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडे हँडहेल्ड उपकरणे आणि वाहन अॅप यांची उपलब्धता असणार आहे.

विम्यासाठी अॅपचा वापर

"पोलिस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेल्या हॅंडहेल्ड उपकरणांतून रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या वाहन अॅपचा वापर करून वाहनांकडे विमा आहे की नाही हे तपासता येईल, आणि त्याचबरोबर या उपकरणांतून वाहतूक विभागाच्या नेटवर्कशी जोडलेल्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा थर्ड पार्टी इन्शुरन्सदेखील त्वरीत काढून देण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

"या ऑन-द-स्पॉट पॉलिसींचा प्रीमियम त्वरीत भरण्यासाठी, बँकांसह विमा कंपन्यांनादेखील फास्टॅग प्लॅटफॉर्मवर आणले जाऊ शकते. प्रीमियमची रक्कम फास्टॅग बॅलन्समधून कापून घेतली जाईल," असे हा अधिकारी पुढे म्हणाला.

थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम

थर्ड-पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम हा वाहनांच्या आकारावर आणि वयावर अवलंबून असतो. १००० सीसी वाहनांसाठी २०७२ रुपये, १००० ते १५०० सीसी वाहनांसाठी ३२११ रुपये आणि १५०० सीसीवरील वाहनांसाठी ७,८९० रुपये इतका हा प्रीमियम आहे. नुकत्याच झालेल्या जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या बैठकीत ही ऑन-द-स्पॉट विम्याबाबत चर्चा करण्यात आली होती.इर्डा या विमा नियामक संस्थेने याअगोदरच विमा कंपन्यांना जप्त केलेल्या वाहनांसाठी तात्पुरता, अल्पकालीन मोटार विमा जारी करण्याची परवानगी दिलेली आहे.

विभाग